मुंबई -गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या तिसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेता दोदी खाननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये त्यानं राखीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तसेच राखीनं देखील अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की, ती दोदीशी लग्न करणार आहे. तिचं लग्न पाकिस्तानमध्ये होईल तर रिसेप्शन भारतात होणार, याबद्दल तिनं तिच्या चाहत्यांना माहिती दिली होती. दरम्यान पाकिस्तानी कलाकार दोदीनं यू-टर्न घेतला आहेत, त्यानं राखीला फ्रेंड झोनमध्ये ठेवलं आहे. इंस्टाग्रामवर दोदीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, तो राखीशी लग्न करू शकत नाही, कारण त्याला अनेकजण राखीबरोबर लग्न करत असल्यानं ट्रोल करत आहेत.
दोदी खाननं मारला यू-टर्न : दोदी खाननं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत, म्हटलं की, "अस्सालामु वालेकुम हिंदुस्तान पाकिस्तान, मी दोदी खान...काही दिवसांपूर्वी तुम्ही माझा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये मी राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तुम्ही हे अगदी बरोबर पाहिलं आहे. राखीला प्रपोज करण्याचं कारण म्हणजे मी तिला खूप चांगलं ओळखतो, ती माझी चांगली मैत्रीण आहे. जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा ती मला देवावर प्रेम करणारी व्यक्ती वाटली. तिनं आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. तिनं तिचे पालक गमावले आणि आता तिच्या आजारपणात दुःखाबरोबर आहे. तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आला, त्यानं तिच्याबरोबर काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. ती एका मोठ्या आघातातून बाहेर आली आहे. तिनं इस्लाम स्वीकारला, उमराह केला, फातिमा नाव ठेवलं, माशाअल्लाह ही खूप मोठी गोष्ट आहे."