मुंबई :लॉस एंजेलिसमधील विनाशकारी जंगलातील आगीमुळे 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर परिणाम झाला होता. ऑस्कर 2025 साठी नामांकनांची घोषणा 23 जानेवारी रोजी होणार आहे. अकादमीचं सीईओ बिल क्रॅमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी एका निवेदनात याबद्दल पुष्टी केली आहे. 97व्या ऑस्कर पुरस्काराचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे एबीसी हुलु लाइव टीवी, यूट्यूब टीवी, एटीएंडटी टीवी आणि फूबोटीवी प्लॅटफॉर्मवर होईल. या कार्यक्रमाला फ्रीमध्ये प्रेक्षक पाहू शकतात. हा कार्यक्रम सकाळी 7:00 वाजता EDT, दुपारी 4:00 वाजता PDT, सकाळी 11:00 वाजता GMT, संध्याकाळी 7:00 वाजता CST पाहिला मिळेल.
कुठे होणार कार्यक्रम :दरम्यान 97व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया बोवेन यांग आणि रेचल सेनोट यांच्याकडून केली जाईल. तर ऑस्कर 2025चे सूत्रसंचालन विनोदी कलाकार कोनन कॉनन ओ'ब्रायन करणार आहेत. अकादमीचे सीईओ बिल क्रॅमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी याची घोषणा केली आहे. कोनन कॉनन पहिल्यांदाच ब्रॉडकास्ट शो होस्ट करणार आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवार, 2 मार्च 2025 रोजी ओव्हेशन हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला जगभरातील स्टार्स रेड कार्पेटवर त्यांचे ग्लॅमर दाखवताना दिसतील.
आगामी ऑस्कर कार्यक्रम
- गुरुवार, 23 जानेवारी 2025
ऑस्कर नामांकनांची घोषणा
- मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
अंतिम वोटिंग सकाळी 9 वाजता PSTपासून सुरू होईल.
- मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025