हैदराबाद Oscar Nominations 2025 :अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं अखेर 2025 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी बहुप्रतिक्षित नामांकनं जाहीर केली आहेत. लॉस एंजेलिसमधील विनाशकारी वणव्यामुळं 97 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांची घोषणा अनेक वेळा पुढं ढकलण्यात आली. 23 जानेवारी रोजी अभिनेते राहेल सेनॉट आणि बोवेन यांग यांनी एका लाईव्ह-स्ट्रीम कार्यक्रमादरम्यान ही नामाकनं जाहीर केली. 2 मार्च रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणाऱ्या ऑस्करचं सूत्रसंचालन कोनन ओ'ब्रायन करतील. नामांकनांबद्दल बोलायचं झाले तर, एमिलिया पेरेझ 13 नामांकनांसह आघाडीवर आहे, तर विक्ड आणि द ब्रुटालिस्ट यांना प्रत्येकी 10 नामांकनं मिळाली आहेत. दरम्यान, प्रियांका चोप्रा, गुनीत मोंगा आणि मिंडी कलिंग यांच्या 'अनुजा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट श्रेणीत स्थान मिळालंय.
oscar नामांकनांची संपूर्ण यादी :
सर्वोत्तम चित्रपट
- अनोरा
- द ब्रुटालिस्ट
- अ कम्प्लीट अननोन
- कॉन्क्लेव्ह
- ड्यून : भाग दोन
- एमिलिया पेरेझ
- आय एम स्टिल हिअर
- निकेल बॉईज
- द सबस्टन्स
- विक्ड
सर्वोत्तम दिग्दर्शक
- शॉन बेकर, अनोरा
- ब्रॅडी कॉर्बेट, द ब्रुटालिस्ट
- जेम्स मॅंगोल्ड, अ कम्प्लीट अननोन
- जॅक ऑडियर्ड, एमिलिया पेरेझ
- कोराली फारगेट, द सबस्टन्स
सर्वोत्तम अभिनेता
- एड्रियन ब्रॉडी, द ब्रुटालिस्ट
- टिमोथी चालमेट, अ कम्प्लीट अननोन
- कोलमन डोमिंगो, सिंग सिंग
- राल्फ फिएनेस, कॉन्क्लेव्ह
- सेबास्टियन स्टॅन, द अप्रेंटिस
सर्वोत्तम अभिनेत्री
सिंथिया एरिव्हो, विक्ड
कार्ला सोफिया गॅस्कोन, एमिलिया पेरेझ
मायकी मॅडिसन, अनोरा
डेमी मूर, द सबस्टॅन्स
फर्नांडा टोरेस, आय एम स्टिल हिअर
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
- युरा बोरिसोव्ह, अनोरा
- किअरन कल्किन, अ रिअल पेन
- एडवर्ड नॉर्टन, अ कम्प्लीट अननोन
- Guy Edward Pierce, द ब्रुटालिस्ट
- जेरेमी स्ट्रॉंग, द अप्रेंटिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- मोनिका बारबारो, अ कम्प्लीट अननोन
- एरियाना ग्रांडे, विक्ड
- फेलिसिटी जोन्स, द ब्रुटालिस्ट
- इसाबेला रोसेलिनी, कॉन्क्लेव्ह
- झो साल्दाना, एमिलिया पेरेझ
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा
- A Complete Unknown
- कॉनक्लेव्ह
- एमिलिया पेरेझ
- निकेल बॉईज
- Sing Sing
सर्वोत्तम मूळ पटकथा
- अनोरा
- द ब्रुटालिस्ट
- अ रिअल पेन
- 5 सप्टेंबर
- द सबस्टन्स
सर्वोत्तम छायाचित्रण
- द ब्रुटालिस्ट
- ड्यून: भाग दोन
- एमिलिया पेरेझ
- मारिया
- नोस्फेराटू