महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ओम पुरी जयंती : ओम पुरी यांच्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपटातील भूमिकांचा प्रवास

प्रतिभावान दिग्गज अभिनेता ओम पुरी यांनी चार दशकाहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर अनेक व्यक्तीरेखा जीवंत केल्या. आज त्यांच्या जयंतीनिमित्त यावर एक नजर टाकूयात.

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

Om Puri  Birth anniversarry
ओम पुरी जयंती ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता ओम पुरी यांची जयंती साजरी होत आहे. चार दशकाहून अधिक काळ गाजवलेल्या ओम पुरी यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटावर एक नजर टाकूयात आणि त्यांच्या अफाट प्रतिभेचे प्रदर्शन करणाऱ्या त्याच्या काही सर्वात प्रतिष्ठित भूमिकांची आपण पुन्हा भेट घेऊ या.

1. आक्रोश (1980)

आक्रोश (1980) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

गुलजार दिग्दर्शित या नाट्यमय चित्रपटात ओम पुरी यांनी अन्याय झालेल्या मित्राला न्याय मिळवून देणाऱ्या हताश माणसाची भूमिका केली होती. त्याच्या व्यथा आणि निराशेच्या चित्रणानं प्रेक्षकांनाही भावूक बनवलं. या चित्रपटानं ओम पुरींच्या करियरला उभारी मिळाली.

2. सिटी ऑफ जॉय (1992)

सिटी ऑफ जॉय (1992) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

भारतीय चित्रपटसृष्टीत प्रगल्भ भूमिका साकारणाऱ्या ओम पुरी यांनी पॅट्रिक स्वेझ यांच्याबरोबर सिटी ऑफ जॉय या हॉलिवूड चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये त्यांनी हाजरा या रिक्षाचालकाची भूमिका केली होती. यातल्या भूमिकेनं कोलकात्यातील जीवन संघर्षाचा वेध घेतला गोला आणि त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. या चित्रपटातून ओम पुरी यांच्या अभिनयातून भावना व्यक्त करण्याची त्याची क्षमता दिसून आली.

3. मकबूल (2003)

मकबूल (2003) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

शेक्सपियरच्या "मॅकबेथ" या अजरामर कलाकृतीच्या या रूपांतरामध्ये ओम पुरी यांनी भ्रष्ट पोलिसाची भूमिका साकारली. माणसाच्या जीवनातील महत्वाकांक्षा आणि विश्वासघात याचे खोलवर थर यात पाहायला मिळाले. अतिशय सुक्ष्म निरक्षणं नोंदवत जीवंत व्यक्तीरेखा साकारण्याची ओम पुरी यांची प्रतिभा याचं उत्कृष्ट दर्शन यातून घडलं.

4. बजरंगी भाईजान (2015)

बजरंगी भाईजान (2015) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

या हृदयस्पर्शी चित्रपटात ओम पुरी यांनी सहाय्यक मार्गदर्शकाची भूमिका साकारली होती. भूमिका कमी लांबीची असली तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर संस्मरणीय बनवण्याचं त्याचं कसब यातून दिसलं.

5. अर्ध सत्य (1983)

अर्ध सत्य (1983) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

या चित्रपटात ओम पुरी यांनी इन्स्पेक्टर अनंत वेलणकर या भ्रष्टाचार आणि वैयक्तिक अडचणींशी लढा देणारा पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारली. यातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

6. सिंग इज किंग (2008)

सिंग इज किंग (2008) ((Photo/ ANI /YouTube/@ultramovie))

या चित्रपटात ओम पुरी यांनी हॅप्पी सिंग (अक्षय कुमार) याला मार्गदर्शन करणाऱ्या एका खेड्यातल्या वृद्धाची भूमिका साकारली होती. आपल्या अष्टपैलू अभिनय क्षमतेचं दर्शन घडवताना ओम पुरी यांनी मार्मिक क्षणांसह कॉमेडीचे कुशलतेने मिश्रण केले.

ओम पुरी यांचा वारसा कलारा आणि चित्रपट निर्मात्यांना सारखाच प्रेरणा देत आला आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर विचार आणि चर्चा करण्यासही प्रवृत्त केलं. यामुळे ओम पुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती बनले.

आज ओम पुरी यांचं स्मरण करताना त्यांनी साकारलेल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा सदैव आपल्या बरोबर आहेत. वर दिलेले चित्रपट हे केवळ त्यांच्या अभिनयाची विविध छटा दाखवणारे आहेत. असे असंख्य चित्रपट आहेत ज्यातून ओम पुरी हे प्रत्येक काळात आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकीच वाटत राहतात. आपण जर ओम पुरी यांचे चाहते असाल तर त्यांचे इतरही अनेक चित्रपट आपल्यासाठी वेगवेगळ्या माध्यामांवर उपलब्ध आहेत. त्याच्या चित्रपटाचा उत्तम संग्रह तुम्हाला नेहमी ऊर्जा देणारा ठरु शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details