महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

2024 मध्ये पुन्हा रिलीज झालेल्या जुन्या चित्रपटांना मिळाली मनोरंजनाची दुसरी संधी - YEAR ENDER 2024

सोहम शाहला नेहमी वाटायचं की 'तुंबाड' चित्रपट बॉक्स ऑफिससाठी 'अधिक पात्र आहे', तर साजिद अली आनंदी आहे कारण त्याला 'लैला मजनू'ला लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला.

YEAR ENDER 2024
2024 मध्ये री रिलीज चित्रपट ((Photo: Film posters/ETV Bharat))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 20, 2024, 7:50 PM IST

रुपेरी पडद्यावर अनेक प्रतिष्ठित चित्रपट पुन्हा एकदा रिलीज झाल्यानं बॉलिवूडसाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचं ठरलं. नॉस्टॅल्जिया, मोठ्या पडद्यावरचा अनुभव, सामुदायिक दृश्यं पाहण्याचा अनुभव, कुतूहल यासह बऱ्याच जुन्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं परत एका पहिल्या इतकंच मनोरंजन केलं. जुन्या पिढीचं भरपूर मनोरंजन केलेले चित्रपट नव्या पिढीलाही आवडतात ही यातली खास गोष्ट मानावी लागेल. उदाहरण घ्यायचं तर रितेश देशमुख आणि जेनेलियाचा पहिला एकत्रीत चित्रपट 'तुझे मेरी कसम' दोन दशकानंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. हा सिनेमा दरवर्षी थिएटरमध्ये झळकतो आणि नव्या पिढीतील तरुणाई त्याचं जोरदार स्वागत करते. यावर्षी री-रिलिज झालेल्या लक्षवेधी चित्रपटांमध्ये 'वीर-जारा', 'लैला मजनू', 'रॉकस्टार', 'जब वी मेट' आणि 'तुंबाड' यासारख्या चित्रपटांना चांगलं यश मिळाल्याचं दिसून आलं.

'लैला मजनू'चे लेखक आणि प्रस्तुतकर्ता, इम्तियाज अली यांनी चित्रपटाच्या देशभरात प्रदर्शनाची घोषणा केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी परत एकदा साथ दिल्यानं त्यांनी प्रेक्षकांचं आभार मानले आहेत. क्लासिक लोककथेचे आधुनिक काळातील रूपांतर असलेला 'लैला मजून' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. "प्रेक्षकांनी आधी रॉकस्टारसाठी विचारलं आणि नंतर लैला मजनूसाठी...आम्ही असा क्लासिक सिनेमा परत आणू शकतो हा एक चांगला उपक्रम आहे. मला आनंद आहे की लोक त्यांना हवे तेव्हा माझे चित्रपट पुन्हा पाहू शकतात. मला वाटतं की चांगला सिनेमा कधीच मरत नाही,” असं इम्तियाज अलीनं ईटीव्ही भारतला सांगितलं.

इम्तियाज अली ((Photo: ETV Bharat))

सोहम शाहचा 'तुंबाड' हा चित्रपट 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा री-रिलीज चित्रपट ठरला. त्यानंतर इम्तियाज अलीचा 'रॉकस्टार' आणि 'लैला मजनू' यांचा क्रमांक लागतो. मागील विक्रमांना मागे टाकणाऱ्या या चित्रपटांशिवाय, 'मैने प्यार किया', 'कल हो ना हो', 'करण अर्जुन', 'परदेस', 'रहना है तेरे दिल में', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'चक दे इंडिया', 'ये जवानी है दिवानी', 'हम आपके है कौन' ​​यांसारखे सुमारे डझनभर चित्रपट, तसेच तमिळ आणि तेलुगू भाषेतील अनेक सिनेमे गेल्या काही महिन्यांपासून थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाले आहेत. यापैकी बहुतेक री-रिलीजनं चांगली कामगिरी केली आहे.

“करण अर्जुन यंदा पुन्हा रिलीज झाला. हा चित्रपट निर्माता म्हणून माझ्यासाठी एक प्रयोग आहे. मी घाबरलो होतो, कारण मी माझा चित्रपट नव्या पिढीसमोर मांडत आहे, ही एक पुनर्जन्माची कथा आहे. पुन्हा रिलीज झाल्यामुळे मला सध्याच्या सिनेप्रेमींची मानसिकता कळण्यास मदत झाली,” असं राकेश रोशन म्हणाले होते. पण शाहरुख खान, रणबीर कपूर, शाहिद कपूर, चिरंजीवी आणि विजय यांनी त्यांच्या काही सर्वात मोठ्या हिट चित्रपटांचे पुन: प्रदर्शन केलं असतानाही, यंदाच्या वर्षात सर्वात जास्त व्यवसाय एकही नावाजलेल्या हिरो नसलेल्या एका 'तुंबाड' नावाच्या हॉरर चित्रपटानं केला आहे.

सोहम शाह ((Photo: ETV Bharat))

'तुंबाड' 2017 मध्ये त्याच्या मूळ रिलीज झाल्यानंतर, चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती, परंतु बॉक्स ऑफिसवर तो फारसा काही कमाई करू शकला नव्हता. कारण त्याला त्यावेळी 'अंधाधुन' आणि 'बधाई हो' सारख्या चित्रपटांकडून स्पर्धेचा सामना करावा लागला होता. परंतु पुन्हा रिलीज झाल्यावर त्यानं सुमारे 40 कोटी इतकी तिप्पट कमाई केली. सोहम शाहला त्याच्या श्रमावर पूर्ण विश्वास होता. यासाठी त्यानं सात वर्षे स्वतःला वाहून घेतलं होतं.

“सुरुवातीला तुंबाडला फारसं प्रेम मिळालं नसलं तरी मला इंडस्ट्रीतील लोकांचे फोन येऊ लागले आणि हळूहळू या चित्रपटाला ओळख मिळू लागली. चित्रपटाला न्याय मिळाला नाही असं मला नेहमीच वाटत होतं. आम्ही तो चित्रपट खूप प्रेमानं बनवला होता. तो बनवायला आम्हाला सात वर्षे लागली होती. समीक्षकांनी त्याचं कौतुक केलं, परंतु बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांनी चकवा दिला. मला नेहमीच वाटायचे की हा चित्रपट अधिक पात्र आहे आणि तो मोठ्या पडद्यावर पाहायचा होता. होय, बऱ्याच लोकांनी तो ओटीटीवर पाहिला आहे. तुंबाड बनवत असताना मला विचारणा करणारे मला तुंबाड पुन्हा रिलीज करण्यास हीच योग्य वेळ असल्याचं सांगत होते. त्यांचे मेसेज आल्यानंतर मला वाटलं की, तो पुन्हा रिलीज करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असं सोहम शाह म्हणाले.

'तुंबाड', 'रॉकस्टार' आणि 'लैला मजनू' हे या वर्षातील सर्वात यशस्वी री-रिलीज चित्रपट आहेत. तत्कालीन नवोदित कलाकार अविनाश तिवारी आणि आता लोकप्रिय असलेली तृप्ती डिमरी अभिनीत 'लैला मजनू' 2018 मध्ये रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर केवळ 2.18 कोटी कलेक्शन करु शकला होता.

साजिद अली (Sajid Ali, Filmmaker (Photo: ETV Bharat))

“जेव्हा लैला मजनू (नवीन कलाकारांसह) आला तेव्हा कदाचित लोकांना चित्रपटगृहात पाहण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यास प्रोत्साहन मिळालं नसेल. परंतु तुम्ही जे काही करता ते गुणवत्तापूर्ण असते ते शेवटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधून काढते. एवढी वर्षे लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहत राहिले, अगदी यूट्यबवर पायरेटेड कॉपीही लोकांनी पाहिली आणि प्रेक्षकांचा समुदाय वाढत गेला. माउथ पब्लिसीटीमुळं या चित्रपटाला चांगला लाभ झाला. काहीवेळा तुम्हाला श्रमाचा परतावा एका झटपटात मिळतो तर काहीवेळा तुम्हाला तो EMI मध्ये मिळतो आणि तो छोट्या छोट्या मार्गांनी येत राहतो. मग लोकांनी ते प्रदर्शित झाल्यावर हा सिनेमा आपण थिएटरमध्ये का पाहिला नाही याची खंत वाटू लागली. मग मला पुन्हा रिलीजचे वेध लागले. मला नम्रपणे वाटतं की लोकांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला आणि थिएटरमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. तसेच, तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी हे दोघंही अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत, त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढतच गेली," असं चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद अली री-रिलीजबद्दल म्हणतात.

री-रिलीझ आता मल्टीप्लेक्सकडून एक स्ट्रॅटेजी म्हणून विकसित

चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड बॉलीवूडसाठी नवीन नाही. हा ट्रेंड 70, 80 आणि 90 च्या दशकापर्यंत प्रचलित होता, जेव्हा 'मदर इंडिया', 'मुघल-ए-आझम', 'शोले' आणि 'आँखे' यांसारख्या चित्रपटांनी थिएटरमध्ये यशस्वी पुनरागमन केलं होतं. परंतु अलीकडच्या काळात चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची कमतरता आणि मनोरंजक नवीन चित्रपट नसल्यामुळे पुन्हा चालण्याचा ट्रेंड मूलत: सुरू झाला आणि परिणामी जुन्या चित्रपटांच्या पसंतीचा फायदा झाला. त्यामुळे, ज्या चित्रपटांनी भक्कम आधार निर्माण झाला आहे. री-रिलीजच्या या ट्रेंडने मोठ्या प्रमाणात वेग घेतला तेव्हा याकडे प्रदर्शक आणि थिएटर-मालकांनी “नॉस्टॅल्जिया शोकेस” किंवा “लीन वीकेंड भरणे” या पलीकडे पाहण्यास सुरुवात केली असल्याचं पीव्हीआर आयनॉक्सच्या लीड स्ट्रॅटेजिस्ट निहारिका बिजली यांनी सांगितलं.

“आमची री-रिलीझ स्ट्रॅटेजी सुरुवातीला एक प्रयोग म्हणून सुरू झाली आणि रिलीज दरम्यान आमच्या प्रोग्रामिंगमधील पोकळी भरण्याचा एक मार्ग मिळाला. तथापि, आम्ही रॉकस्टार, जब वी मेट आणि तुंबाड यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांना पुन्हा रिलीज करण्यासाठी क्युरेट करण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला आमच्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळालं. री-रिलीज आता एक स्ट्रॅटेजी म्हणून विकसित झाली आहे. यामुळं पिढ्यांना एकत्र करण्याचा एक शक्तिशाली मार्ग मिळाला आणि पहिल्यांदाच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर क्लासिक्सचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. नॉस्टॅल्जिक चाहत्यांना प्रेमळ आठवणींना उजाळा देण्याची संधी देखील यामुळे दिली गेली. कल हो ना हो सारख्या चित्रपटांचे उल्लेखनीय यश केवळ सिनेमाच्या कालातीत जादूवरच प्रकाश टाकत नाही तर अनोखं, तल्लीन अनुभव निर्माण करण्याची आमची बांधिलकी देखील दर्शवतं. भूतकाळ आणि वर्तमानाचं हे मिश्रण प्रिय क्लासिक्सला नवीन सांस्कृतिक क्षणांमध्ये बदलत आहे, कथाकथन प्रेक्षकांना कालांतरानं कसं जोडतं आणि थिएटरचा अनुभव भारतीय सिनेमाच्या हृदयाशी कसा जोडलेला आहे हे दर्शवतं., " असं निहारिका बिजली म्हणाल्या.

सिनेपोलिस आणि सिंगल स्क्रीन सारख्या मल्टिप्लेक्स साखळ्यांनी देखील बँडवॅगनवर उडी घेतल्यानं यशस्वी री-रिलीज देखील त्यांचा प्रेक्षकवर्ग केवळ महानगरांमध्येच नव्हे तर इतरत्रही वाढवताना दिसत आहे. “टायटॅनिक, अवतार यांसारखे जुने 3-डी चित्रपट पुन्हा-रिलीज करणं... नेहमीच आमच्या धोरणाचा भाग राहिलं आहे, आम्ही अनेकदा हे चित्रपट महोत्सव देखील करतो पण यावर्षी ती एक स्ट्रॅटेजी बनली. आम्ही काही वेळा पाहिलंय की, नवीन रिलीज होणारे चित्रपट चालत नाहीत. म्हणून आमच्या एकूण व्यवसायाचा भाग म्हणून जुने चित्रपट समाविष्ट करणं ही एक डावपेचात्मक चाल होती जेणेकरून आम्हाला चित्रपटगृहात अधिक लोक येऊ शकतील. तसेच, जुन्या चित्रपटांच्या तिकिटाची किंमत नवीन चित्रपटांपेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे, ज्या काळात कमी नवीन सिनेमे आहेत अशा काळात चित्रपट पुन्हा रिलीज करणं हे आमच्यासाठी अर्थपूर्ण आहे," असं, सिनेपोलिस इंडियाच्या आशिष मिश्रा यांनी सांगितलं.

ऑक्टोबरमध्ये 'वेक-अप सिद'च्या 15व्या वर्धापन दिनासारखे उत्सव साजरे करणे किंवा राज कपूरच्या शताब्दीनिमित्त अलीकडेच आयोजित करण्यात आलेले चित्रपट महोत्सव आयोजित करणे हे री-रिलीज करण्याचे काही इतर मार्ग आहेत.

निहारिका बिजली ((Photo: ETV Bharat))

“मेरा नाम जोकर हे एक उत्तम उदाहरण आहे .. जरी काही चित्रपट सध्याच्या ट्रेंडच्या तुलनेत खूप लांब होते, तरीही लोक त्याचा आनंद घेत होते आणि आमच्याकडे चांगला ऑक्युपन्सी रेट होता. यावर्षी आमचा तीन टक्के प्रवेश या सिनेमांच्या माध्यमातून झाला होता. सुमारे 75 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बरसात'ला वृद्ध लोकांसह त्यांची मुले आणि नातवंडे असलेल्या कुटुंबांकडून असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी आम्ही रेट्रो फिल्म फेस्टिव्हल केला होता ज्यात आम्ही बाजीगर, मैं खिलाडी तू अनारी सारखे 90 च्या दशकातील काही चित्रपट केले होते या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. हे असे चित्रपट आहेत जे माझ्या पिढीतील लोकांनी आम्ही लहान असताना पाहिले होते आणि आयकॉनिक गाणी आणि दृश्यांमुळे आम्हाला ते पुन्हा पहायचे आहेत. स्क्रिनिंग दरम्यान हे एक छान वातावरण आहे कारण लोकांना संवाद, गाण्याच्या स्टेप्स माहित आहेत ... चित्रपटाचा आनंद घेण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. आम्ही या ट्रेंडवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि तो आमच्या रिलीज स्ट्रॅटेजीचा भाग राहील,” असं मिश्रा यांनी पुढं सांगितलं.

2025 मध्ये री-रिलीज मोठ्या प्रमाणावर नाही?

आता चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणे मल्टिप्लेक्सच्या रिलीज धोरणाचा अविभाज्य भाग बनला असेल परंतु हे सर्व नवीन चित्रपटांच्या रिलीज कॅलेंडरवर अवलंबून असेल. “२०२४ मध्ये ब्लॉकबस्टर्स चित्रपट फार झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा-रिलीजमुळे लोकांना परत येण्याची आणि मोठ्या पडद्यावर ते नॉस्टॅल्जिक चित्रपट पाहण्याची खूप चांगली संधी मिळाली कारण असे बरेच लोक आहेत ज्यांनी दिलवाले दुल्हनिया किंवा तुंबाड पाहणं मिस केलं होतं. परंतु, 2025 मध्ये नवीन रिलीजसाठी खूप चांगले चित्रपट दिसत आहेत. त्यामुळे री-रिलीज कदाचित वारंवार होणार नाहीत. रिलीझच्या खराब कामगिरीमुळेच आम्ही री-रिलीजवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे."

2025 मध्ये काही मोठे नवीन चित्रपट रिलीज होणार आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांचा डेटा फ्रँचायझी चित्रपटांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं री-रिलीजचे प्रमाण निम्म्यानं कमी होईल, असं मत मिश्रा यांनी व्यक्त केलं. "भूल भुलैया, सिंघम, पुष्पा, स्त्री, केजीएफ याप्रकारचियी केवळ हॉलिवूड आणि प्रादेशिक मधूनही काही फ्रेंचायझी चित्रपटांची अपेक्षा पुढील वर्षी करत आहोत. फ्रँचायझी चित्रपटांच्या यशाचा ट्रेंड पुढच्या वर्षीही कायम राहील. जर आम्ही या वर्षी 50 चित्रपट पुढील वर्षी पुन्हा प्रदर्शित केले तर ते 25 ते 30 पुन्हा प्रदर्शित होऊ शकतात परंतु आम्हाला या चित्रपटांकडून योगदानाची अपेक्षा आहे.,” असं मिश्रा म्हणतात.

री-रिलीज चित्रपट निर्मात्यांना दिलासा आणि संदेश देत आहे

जुन्या चित्रपटांना असलेली प्रेक्षकांची मागणी निश्चितपणे चित्रपट निर्मात्यांना एक महत्त्वाचा संदेश देतं आहे की, त्यांनी सार्वजनिक अभिरुचीनुसार त्यांच्या सामग्रीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. “पुन्हा रिलीज होण्याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे निर्मात्यांना दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीसाठी अधिक वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. आता असं नाही की, तुम्ही फक्त एका शुक्रवारसाठी रिलीजसाठी जात आहात, कदाचित तुम्ही चांगल्या चित्रपटाचा वारसाही निर्माण करत असू शकता. त्यामुळे पुढील काळातही कमाई होऊ शकेल. उत्तम कथा सांगितल्यास लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. गुणवत्ता शेवटी महत्त्वाची ठरते. पुष्पा, तुंबाड, लैला मजनू यांच्यासाठी लोक थिएटरमध्ये येत आहेत...त्यामुळं निर्मात्यांनी विचार करायला हवा," असं साजिद अली म्हणतात.

“जुने चित्रपट जरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर, यूट्यूबवर उपलब्ध आहेत.. तरीही लोक ते मोठ्या पडद्यावर बघायला येत आहेत. लोकांना तो समुदायानं पाहण्याचा अनुभव आवडतो आणि हा थिएटर उद्योगासाठी मोठा विजय आहे. सर्व उद्योग चढ-उतार यातून जातात.. कोविडनंतर 2023 हे बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने उद्योगासाठी सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते. मला खात्री आहे की सामग्री सादर करण्यात गुंतलेले स्टेकहोल्डर्स आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय टेस्टला आकर्षित करणारी सामग्री असल्याची खात्री करण्यासाठी काम करत आहेत. प्रेक्षकांची थिएटरमध्ये जाण्याची सवय शाबूत आहे, हेखूप महत्त्वाचं आहे,” असा निष्कर्ष मिश्रा यांनी काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details