महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सारा अली खानने जान्हवी कपूरसह जिममध्ये गाळला घाम, ट्रेनर घेतली दिव्य परीक्षा

सारा अली खान ही एक फिटनेस प्रेमी व्यक्ती असून ती आपल्या हार्डकोर वर्कआउट पद्धतींनी चाहत्यांना नेहमीच प्रेरित करते. साराने जिम ट्रेनर नम्रता पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली जान्हवी कपूरच्या बरोबर वर्कआउट सेशनसाठी एकत्र आली होती, त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sara Ali Khan
सारा अली खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 5:38 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सारा अली खान फिटनेससाठी खूप समर्पित आहे. नेहमी चाहत्यांना तिच्या कठोर वर्कआउट रूटीनद्वारे ती प्रेरित करत असते. तिच्या आगामी 'ए वतन मेरे वतन'चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानही, साराची वर्कआउटची कमेटंमेंट कायम आहे. व्यावसायिक गोष्टी करतानाही तिच्या व्यायामशाळेचा नित्यक्रम सांभाळून ती अखंडपणे तिचे पॅक शेड्यूल सांभाळत असते. तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये, सेलिब्रेटी ट्रेनर नम्रता पुरोहितच्या मार्गदर्शनाखाली एक शक्तिशाली वर्कआउट सेशन देण्यासाठी साराने तिची एक जिममधील सहकारी जान्हवी कपूरच्या बोरबरीने काम केले.

सारा अली खान आणि जान्हवी कपूर

सारा अलीने सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती आणि जान्हवी यांनी त्यांच्या व्यायामाच्या सेशनमधून अनेकांना प्रेरणा देताना दिसतात. व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले, "कोणतीही सवलत नाही. कोणतेही गैरवर्तन नाही" म्हणत तिने कंसात इमोजी शेअर केलेत. तिने टीम ट्रेनर नम्रता पुरोहितला टॅग करताना लिहिले, "हिने आम्हाला खूप त्रास दिला." जीम ट्रेनरने एक प्रकारे दोघींची दिव्य परीक्षा घेतल्याचं तिनं सांगितलं.

कामाच्या आघाडीवर, सारा अली खानने 1942 मधील भारत छोडो आंदोलनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा असलेल्या 'ए वतन मेरे वतन' रिलीजची प्रतीक्षा करत आहे.

सत्य घटनांनी प्रेरित हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण कहानीचे कथन करतो. स्वातंत्र्य संग्रामात प्रसिद्ध असलेल्या पण पुरेशा सन्मान न मिळालेल्या लढवय्यांची कथा यामधून दाखवली जाणार आहे. शौर्य, देशभक्ती, बलिदान आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भारतीय तरुणांनी दाखवलेल्या दृढनिश्चयाच्या भावनेचा सन्मान या चित्रपटातून अधोरेखीत करण्यात आला आहे.

कन्नन अय्यर दिग्दर्शित आणि अय्यर आणि दारब फारुकी यांनी सह-लेखन केलेल्या, 'ए वतन मेरे वतन'मध्ये सारा अली खान हिच्यासह सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, अ‍ॅलेक्स ओनील आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत आहेत, इम्रान हाश्मी याचीही एक झलक पाहायला मिळेल. 21 मार्च रोजी या चित्रपटाचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहे.

हेही वाचा -

Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ केला शेअर

Crew trailer launch : 'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर खान झाली नाराज!

Arbaaz Confirms Dabangg 4 : अरबाजचा 'दबंग 4' निर्मितीसाठी दुजोरा, मात्र अ‍ॅटलीशी भेटीचे केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details