मुंबई -अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा दुबईतील व्यावसायिक निर्वाणा बिर्लाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर येऊ लागल्या होत्या. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं अनेकजण सोशल मीडियावर म्हणत होते. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरपासून तिच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत, आता निर्वाणनं या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं अमिषा पटेलबद्दल एक खुलासा केला आहे.
निर्वाण बिर्लानं दिली प्रतिक्रिया :निर्वाण एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "अमिषा आणि मी डेटिंग करत नाही. ती आमची फॅमिली फ्रेंड आहे आणि माझ्या वडिलांना त्यांच्या शाळेपासून ओळखते. आम्ही दोघेही दुबईमध्ये होतो आणि मी माझ्या म्यूझिक अल्बमचे शूटिंग करत होतो, त्यात ती देखील आहे. आम्ही एकत्र काम केलं आहे."
दुबईतून दोघांचेही फोटो व्हायरल : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमिषानं निर्वाण बिर्लासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. यानंतर त्याच्या अफेरच्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या फोटोमध्ये अमिषा आणि निर्वाण काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत होते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिषानं लिहिलं होतं, 'दुबई - माझ्या मित्र निर्वाण बिर्लाबरोबरची प्रेमाची संध्याकाळ.' ही पोस्ट निर्वाणचे वडील यश बिर्ला यांनाही आवडली होती.
निर्वाण बिर्ला कोण आहे? : निर्वाण हा एक व्यावसायिक असून तो वयाच्या 20 व्या वर्षीपासून फॅमिली बिजनेसमध्ये सामील झाला आहे. निर्वाणला बिजनेसव्यतिरिक्त, संगीतातही खूप रस आहे. त्यानं लहान वयातच हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. निर्वाणनं अनेक भजनही रेकॉर्ड केले आहेत.अमिषा पटेलबद्दल बोलायचं झालं तर ती 2023 मध्ये 'गदर 2 'मध्ये बॉलिवूड अभिनेता सनी देओलबरोबर दिसली होती. याशिवाय ती गेल्या वर्षी 'तौबा तेरा जलवा'मध्ये झळकली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता ती पुढं 'गदर 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत 'गदर 2' पुन्हा एकदा होईल रिलीज - Gadar 2
- Gadar 2 vs OMG 2 box office day 19: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' करत आहे राज्य...
- Gadar 2 Twitter review : 'गदर २' वरुन सनी देओल चाहत्यांची विभागणी, काहींना वाटला ब्लॉकबस्टर तर काही झाले निराश