महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पुलकित आणि क्रितीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे सुंदर फोटो, पाहा खास क्षण - Pulkit and kriti wedding reception - PULKIT AND KRITI WEDDING RECEPTION

Pulkit Samrat and kriti kharbanda : पुलकित आणि क्रितीनं लग्नाच्या रिसेप्शनचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही एन्जॉय करताना दिसत आहेत.

Pulkit Samrat and kriti kharbanda
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 4:53 PM IST

मुंबई - Pulkit Samrat and kriti kharbanda : अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी लग्न, मेहंदी आणि संगीत समारंभानंतरच्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या जोडप्यानं 23 मार्च रोजी शेअर केलेले लग्नाच्या रिसेप्शनमधील फोटो आणि व्हिडिओ खूप सुंदर आहेत. पुलकित आणि क्रितीचे मजेदार व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. या जोडप्याच्या पोस्टवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पुलकित आणि क्रितीनं रिसेप्शनच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''इथेच आम्हाला सर्वकाही मिळाले, मिस्टर आणि मिसेस.''

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचं लग्न : या जोडप्यानं 15 मार्च रोजी गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले. यानंतर त्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 मार्च रोजी त्याच्या लग्नाचे फोटो चाहत्याबरोबर शेअर केले होते. या जोडप्यानं खूप साध्या पद्धतीनं विवाह केला आहे. यानंतर 20 मार्च रोजी पुलकित आणि क्रितीनं त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. यामध्ये पुलकितनं हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता आणि क्रितीनं ऑफ व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या जोडप्याचा हा लूक अनेकांना आवडला होता. यानंतर या कपलचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात दोघेही पापाराझी मिठाई वाटप करताना दिसले.

वर्कफ्रंट :दरम्यान, पुलकित आणि क्रितीच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर दोघेही 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकामेंकांना डेट करू लागले. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यानं 2014 मध्ये गर्लफ्रेंड श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं. यानंतर त्याचं 2015 मध्ये नातं तुटलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुलकित शेवटी 'फुकरे 3'मध्ये रिचा चड्ढा आणि वरूण शर्माबरोबर दिसला होता. दुसरीकडे क्रिती शेवटी '14 फेरे'मध्ये दिसली होती. आता पुढं ती 'वान', 'रिस्की रोमियो' 'हाऊसफुल्ल 5', आणि 'पप्पू' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. करीना कपूरने शेअर केली आफ्रिकन सुट्टीतील 'सेरेंगेती सन'ची झलक - Kareena Kapoor in Serengeti Park
  2. अंकिता लोखंडेच्या सासूचा दृष्टिकोन बदलला, चित्रपट प्रदर्शित होताच म्हणाली- 'माझी सून' - Ankita lokhande
  3. कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल... - Kangana Ranaut Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details