महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नयनतारानं नवीन ऑफिसचे फोटो शेअर करत टीमचे मानले आभार - Nayanthara - NAYANTHARA

Nayanthara : नयनतारानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या नवीन ऑफिसची झलक दिसत आहे.

Nayanthara
नयनतारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 9:00 PM IST

मुंबई - Nayanthara : अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये झळकलेली नयनतारा सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपडेट्स ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नयनतारानं गेल्या वर्षी शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती. आता शेवटी ती 'अन्नपूर्णी' चित्रपटात दिसली होती. दरम्यान तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या टीमबरोबर आहे. नयनतारानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे नवीन ऑफिस आहे.

नयनतारानं नवीन ऑफिसचे फोटो केले शेअर: तिच्या ऑफिसचे फोटो शेअर करत तिनं पोस्टवर लिहिलं, ''माझ्यासाठी एक जादुई प्रवास म्हणजेच आपल्या स्वप्नांचे कार्यालय तयार करणे होतं, माझी ही इच्छा होती. 30 दिवसांत स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या प्रिय निखिता रेड्डीला धन्यवाद तू सर्वोत्तम आहेस. माझे हे स्वप्न एकत्रीतपणे पूर्ण केल्याबद्दल आणि हा प्रवास अविस्मरणीय बनवल्याबद्दल माझ्या संपूर्ण टीमचे आभार.'' आता या फोटोवर नयनतारा चाहते कमेंट्स करून तिला नवीन ऑफिस तयार केल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत. नयनताराचं स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल तिनं तिचा आनंद व्यक्त केला आहे.

नयनताराचे आगामी चित्रपट : नयनतारानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या नवीन ऑफिसची झलक पाहायला मिळते. या फोटोमध्ये तिनं पांढरा कुर्ता आणि अफगाणी पॅन्ट घातला आहे. फोटोत ती तिच्या टीमबरोबर बोलताना दिसत आहे. 'जवान'च्या दमदार यशानंतर तिचे नशीब उजळले आहे. नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती 'लायन ' चित्रपटामध्ये पुन्हा एकदा शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार करणार आहे. 'लायन' चित्रपटाकडून नयनताराला खूप अपेक्षा आहेत. याशिवाय पुढं ती 'मन्नगट्टी', 'अरे कुरुवी' , 'ऑटो जानी' आणि 'नयनतारा 81' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शीर्षक ठरायचं आहे.

हेही वाचा :

  1. विजय देवेरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर 'द फॅमिली स्टार'च्या कमाईत घसरण... - the family star Movie
  2. 'मेरी एक ही 'दिशा'...', म्हणत रिलेशनशिप स्टेटसवर टायगर श्रॉफचा खुलासा - Tiger Shroff Relationship
  3. अल्लू अर्जुन चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर पडला, व्हिडिओ व्हायरल - HAPPY BIRTHDAY ALLU ARJUN

ABOUT THE AUTHOR

...view details