महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आयआयएममध्ये प्रवेशावरून ट्रोल करणाऱ्यांना नव्या नवेली नंदानं दिलं चोख प्रत्युत्तर - Navya Naveli and iim ahmedabad - NAVYA NAVELI AND IIM AHMEDABAD

Navya Naveli Nanda : आयआयएममध्ये प्रवेशावरुन ट्रोल करणाऱ्यांना नव्या नवेली नंदानं उत्तर दिलं आहे. आता अमिताभ बच्चन यांच्या नातीचं हे उत्तर सर्वत्र गाजत आहे.

Navya Naveli Nanda
नव्या नवेली नंदा (नव्या नवेली (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 27, 2024, 7:45 PM IST

मुंबई - Navya Naveli Nanda :अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत स्टारकिड्सपैकी एक आहे. नव्या मोठ्या पडद्यापासून सध्या दूर आहे. ती तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असून व्यावसायिक जगात नाव कमवत आहे. अलीकडेच, नव्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती. तिनं आयआयएम अहमदाबाद या देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेतला. यानंतर तिनं आपला आनंद व्यक्त कर सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. नव्याच्या आयआयएम अहमदाबादमध्ये ॲडमिशन झाल्याच्या बातमीवर काही लोकांनी तिची खूप प्रशंसा केली होती.

नव्या नवेली नंदानं दिलं ट्रोल करणाऱ्यांना उत्तर : याशिवाय काही यूजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता नव्यानं सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एका संवादादरम्यान नव्या नवेली नंदा सोशल मीडिया ट्रोलिंगवर उघडपणे बोलली. ट्रोलिंगबद्दल बोलताना तिनं आपली मते देखील मांडली. यावेळी नव्यानं म्हटलं,'सोशल मीडिया हे खूप चांगले प्लेटफॉर्म आहे, कारण अनेकजण यावर आपली मत स्पष्टपणे मांडू शकतात. असे अनेक लोक आहेत, ज्याच्याकडे पहिले असं काही नव्हतं." यानंतर तिनं पुढं आयआयएम अहमदाबादचा भाग असल्याबद्दल म्हटलं, 'मी स्वतःला भाग्यवान समजते की, मी जगातील काही उत्तम प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण घेत आहे.'

नव्या नवेलीनंदानं केलं विधान : यानंतर तिनं सोशल मीडियावर मिळालेल्या फीडबॅकवर म्हटलं, सोशल मीडियावर मला मिळणाऱ्या फीडबॅकचा मला राग येत नाही. मी फक्त लोकांसाठी काम करते, त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीडबॅकवर मला राग येत नाही. मी लोकांकडून मिळणाऱ्या फीडबॅकवर काम करते, जेणेकरून मी एक चांगली व्यक्ती बनू शकेन. ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना नव्यानं म्हटलं, 'ट्रोल्स काय बोलतात याकडे मी जास्त लक्ष देत नसते. मी फक्त सकारात्मक फीडबॅकवर लक्ष केंद्रित करते. नेहमी मी लोकांकडून मिळणाऱ्या फीडबॅकमधून शिकण्याचा प्रयत्न करत असते. मी मान्य करते की, मी वेगळ्या पार्श्वभूमीतून आली आहे आणि लोकांकडे याबद्दल बोलण्यासाठी बरेच काही असेल. माझी जबाबदारी, माझं काम आणि स्वतःला सुधारण्याची आहे. आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकजण आता देखील नव्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

हेही वाचा :

  1. आराध्या बच्चनबद्दल आत्येबहीण नव्या नवेलीची भन्नाट प्रतिक्रिया, पॉडकास्टमध्ये केलं नव्या पिढीचं गुपित उघड... - Navya Nanda talk about Aaradhya
  2. अमिताभ बच्चनची नात नव्यानं आयआयएमएमध्ये घेतला प्रवेश, 'त्याचा' फोटो शेअर करत मानले आभार - Navya Naveli
  3. सुहाना, अनन्या आणि शनायानं बेस्ट फ्रेंड नव्या नवेलीवर केला प्रेमाचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details