मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानबरोबर 'जवान'सारखा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर आता साऊथ दिग्दर्शक ॲटली बॉलिवूडमधील आणखी एक दमदार चित्रपट देण्याच्या तयारीत आहे.ॲटली बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर चित्रपट करणार आहे. 'जवान'च्या यशानंतर ॲटलीचा सलमान खानसोबतचा पुढचा चित्रपट असल्याची बरीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आता ॲटलीनं सलमानबरोबर चित्रपट करण्याबाबत मौन सोडला आहे. दरम्यान या चित्रपटात सलमान खानबरोबर साऊथचा सुपरस्टार कमल हासन देखील असणार आहे. ॲटलीनं आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये फक्त पाच चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानं दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसववर हिट झाले आहेत.
ॲटलीचा आगामी चित्रपट : आता ॲटलीच्या या नवीन प्रोजेक्टचं नाव 'ए6' ठेवण्यात आलं आहे. एका संवादादरम्यान ॲटलीनं त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं की, हा एक टाईम आणि एनर्जीवाला चित्रपट आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट अर्ध्याहून अधिक तयार आहे. लवकरच या चित्रपटाची कहाणीचं पुनरावलोकन केलं जाईल. यानंतर देवाच्या आशीर्वादानं चित्रपटाची घोषणा करण्यात येईल." यानंतर जेव्हा ॲटलीला सलमान खान आणि त्याच्या 'ए6' प्रोजेक्टमधील संपूर्ण स्टारकास्टबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं सांगितलं, "या चित्रपटाच्या कास्टिंगसह मी सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही जे विचार करत आहात ते खरे आहे. मी तुम्हाला एक मोठे सरप्राईज देणार आहेत. मी असा एक चित्रपट बनवणार आहे, की ज्यामुळे देशासाठी हा चित्रपट अभिमानास्पद असेल. माझ्या सर्व चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. सध्या चित्रपटाच्या कास्टिंगवर काम सुरू असून काही दिवसात हे सर्व तुमच्या समोर येईल. "
सलमान खानचा वाढदिवस : सलमान खान27 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. या विशेष प्रसंगी 'भाईजान' त्याचा मोस्ट अवेटेड 'सिकंदर' चित्रपटाद्वारे त्याच्या चाहत्यांना भेट देणार आहे हे निश्चित. त्याचबरोबर सलमान खानच्या चाहत्यांना ॲटलीच्या चित्रपटातून देखील मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान सलमान खान स्टारर 'सिकंदर' चित्रपट 2025च्या ईदला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याआधी ॲटलीचा' बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता वरुण धवन आहे.
हेही वाचा :