महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हिंदी रंगभूमीवरच्या 'नटसम्राटा'ची एक्झिट, आलोक चॅटर्जी यांचं निधन - ALOK CHATTERJEE PASSED AWAY

इरफान खानचा जवळचा मित्र असलेले आलोक चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. ओम पुरी यांच्यानंतर एनएसडी सुवर्णपदक विजेता ठरलेले ते दुसरे अभिनेता होते.

Alok Chatterjee passed away
आलोक चॅटर्जी यांचं निधन (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 7, 2025, 5:16 PM IST

मुंबई - प्रसिद्ध नाट्य अभिनेता आलोक चॅटर्जी यांचं सोमवारी निधन झालं. आलोक हे ज्येष्ठ अभिनेता इरफान खान यांचे बॅचमेट आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातील चांगले मित्र होते. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'नटसम्राट' या नाटकाच्या हिंदी रुपांतरात त्यांनी आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारुन हिंदी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. ही अजरामर भूमिका साकारुन आपण खऱ्या अर्थानं नटसम्राट असल्याचं त्यांनी सिद्ध केलं होतं.

आलोक चटर्जी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, त्यांच्या शरीरात संसर्ग पसरला होता त्यामुळे त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. सोमवारी रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आलोक यांचा जन्म मध्य प्रदेशातील दमोह येथे झाला, त्यानंतर ते जबलपूर आणि भोपाळमध्येही वास्तव्यास होते. येथून त्यांनी दिल्लीला जाऊन एनएसडीची पदवी घेतली.

इरफान खानशी घनिष्ठ मैत्री

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता इरफान खान हा आलोकचा चांगला मित्र होता. खरं तर दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिकले. ते 1984 ते 1987 पर्यंत बॅचमेट होते आणि दोघांनी एकत्र अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या. आलोक यांनी थिएटरमध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या अभिनेत्याने अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. याशिवाय आलोक यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे सुवर्णपदकही मिळालं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ओम पुरी यांच्यानंतर सुवर्णपदक मिळवणारा आलोक हा दुसरा अभिनेता होते.

आलोक चटर्जी यांनी रंगभूमीवर साकारलेलं नाटकं

  • ए मिड समर नाइट्स ड्रीम (विलियम शेक्सपियर)
  • डेथ ऑफ सेल्समैन (आर्थर मिलर)
  • नट सम्राट
  • स्वामी विवेकानंद
  • अनकहे अफसाने
  • शकुंतला की अंगुठी

आलोक यांनी 'ए मिड समर नाइट्स ड्रीम' हे नाटकं दिग्दर्शित केलं होतं. 'डेथ ऑफ अ सेल्समन' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी त्यात अभिनयही केला होता. याशिवाय 'शकुंतला की अंगुठी', 'अनकहे अफसाने' आणि 'नटसम्राट' या नाटकांचाही ते अविभाज्य भाग होते.

ABOUT THE AUTHOR

...view details