मुंबई - National Cinema Day 2024 : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)नं बुधवार, 18 सप्टेंबर रोजी एक घोषणा केली आहे. एमएआयनं सांगितलं की, 20 सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे 'राष्ट्रीय चित्रपट दिना' साजरा केला जाईल. नॅशनल मल्टीप्लेक्स ट्रेड बॉडीनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, "देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींकडून फक्त 99 रुपये शुल्क आकारले जाईल." राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या तिकिटांची किंमत 99 रुपये असेल. पीव्हीआर,आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाईम आणि डिलाइटसह इतर चित्रपटगृहे या कार्यक्रमासाठी 4,000 हून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवण्यासाठी एकत्र आले आहेत.
मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर - NATIONAL CINEMA DAY OFFER - NATIONAL CINEMA DAY OFFER
National Cinema Day 2024 : ज्यांची चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची इच्छा महागड्या तिकीट दरांमुळे ती पूर्ण होत नसेल त्यांनी एक विशिष्ट दिवस राखून ठेवायला हवा. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं 'राष्ट्रीय चित्रपट दिना'निमित्त एक घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रपटाच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Sep 18, 2024, 3:12 PM IST
|Updated : Sep 18, 2024, 3:26 PM IST
'राष्ट्रीय चित्रपट दिना'निमित्तपाहा आवडीचे चित्रपट :दरम्यान चित्रपटांच्या यादीमध्ये ब्लॉकबस्टर, सीक्वेल आणि टाईमलेस क्लासिक्स यांचा समावेश आहे. यात नवीन रिलीजमध्ये 'युध्रा', 'नवरा माझा नवसाचा 2', 'कहां शुरू कहां खत्म', 'सुच्चा सूरमा', 'ट्रांसफॉर्मर्स वन','नेव्हर लेट गो', 'द बकिंघम मर्डर्स' आणि 'अरदास सरबत दे भले दी' हे चित्रपट आहेत. 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करणारा 'स्त्री 2' यामध्ये आहे. याशिवाय 'तुम्बाड' (2018) आणि 'वीर झारा' (2004) 13 सप्टेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित झाल आहे. चित्रपटाच्या तिकिटांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.
असोसिएशननं दिली माहिती: प्रेक्षक वेबसाइट बुक माय शो (BookMyShow) आणि पेटीएम ( Paytm) सारख्या सेवांद्वारे ऑनलाइन तिकिटे खरेदी करू शकतात. दरम्यान असोसिएशननं एका निवेदनात म्हटलं आहे की, "या यशात योगदान दिलेल्या सर्व चित्रपट रसिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जे लोक अजूनही त्यांच्या चित्रपट पाहण्यासाठी परत गेले नाहीत, त्यांना खुले आमंत्रण." 'राष्ट्रीय चित्रपट दिना'ची ही तिसरी आवृत्ती असेल. दरम्यान 20 सप्टेंबर रोजी कुठला प्लॉन नसेल, तर तुम्ही तुमचे आवडीचे चित्रपट पाहू शकता. जुने चित्रपट पाहून तुम्ही तुमचा दिवस चांगला बनवू शकता. ही बातमी चित्रपटरसिकांसाठी महत्त्वाची आहे. अनेक सिनेप्रेमी आता चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटीकडे वळले आहेत. कमी तिकीट दरांच्या निमित्ताने हे रसिक चित्रपट पाहण्यासाठी आपला मोर्चा थिएटरकडे वळवतील.