महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं नागा चैतन्यनं केलं कबुल, व्हिडिओ व्हायरल - naga chaitanya - NAGA CHAITANYA

Naga Chaitanya : सामंथा रुथ प्रभुचा पूर्वाश्रमीचा नागा चैतन्य आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं सांगताना दिसत आहे.

Naga Chaitanya
नागा चैतन्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:52 PM IST

मुंबई -Naga Chaitanya : साऊथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुचा पूर्वाश्रमीचा अभिनेता पती नागा चैतन्य घटस्फोटानंतर त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आहे. नागानं 2017 मध्ये सामंथाबरोबर लग्न केलं. मात्र या जोडप्याचं नात फार काळ टीकू शकलं नाही. दोघांनींही 2021मध्ये घटस्फोट घेतला आणि ते त्याच्या इच्छेनुसार आयुष्य जगत आहे. नागा साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे. अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात शोभिता ही वनक्षेत्रात जीप सफारीचा आनंद घेताना दिसत होती. याशिवाय नागाचा देखील एक फोटो समोर आला होता. या फोटोत तो वनक्षेत्रात सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत होता.

नागा चैतन्यनं केला धक्कादायक खुलासा : आता एक रेडिटवर नागा चैतन्यची एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्याला विचारण्यात आले की तो टू-टाइम रिलेशनशिपमध्ये कधी राहिला आहे का ? यावर त्यानं उत्तर दिलं, "आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, तेही तुम्ही मोठे झाल्यावर, हो मी सर्व अनुभव घेतले आहेत, पण आता स्थिर होण्याची वेळ आली आहे." हा व्हिडिओ त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनल मुलाखतीचा आहे. जेव्हा सामंथा नागा यांचा घटस्फोट झालं होता, तेव्हा त्याच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकाला येत होत्या. अनेकजण सामंथाला दोषी असल्याचं म्हणत होते. सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये लग्न करण्यापूर्वी काही वर्षे एकामेंकाना डेट केले होते.

वर्कफ्रंट : आता अनेकजण नागा हा दोषी असल्याचं म्हणत आहे. दरम्यान नागाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'थंडेल' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटात नागाबरोबर अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असून याचे नेटफ्लिक्सनं 40 कोटी रुपयांमध्ये हक्क विकत घेतले आहे. 'थंडेल' हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदू मोंडेटी यांनी केलं आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details