मुंबई - Parineeti Chopra : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तीक आयुष्यमुळे खूप चर्चेत असते. यावेळी ती तिच्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिनं काल रात्री 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये दमदार परफॉर्म दिला आहे. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी लग्न करून सेटल झालेली परिणीती आता तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकत आहे. परिणीतीनं नुकतीच तिच्या चाहत्यांना तिच्या डेब्यू सिंगिंग प्रोजेक्टची गोड बातमी दिली होती. आता यानंतर तिनं 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या माध्यामातून स्टेजवर पहिल्यांदाच परफॉर्म केलाय. दरम्यान, परिणीतीनं तिचा स्टेजवरील हा अनुभव शेअर केला आहे.
परिणीती पहिल्या लाइव्ह सिंगिंग परफॉर्मन्सदरम्यान झाली भावूक : इंस्टाग्राम अकाऊंटवर 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2024'मधील तिच्या कामगिरीची पहिली काही झलक शेअर करताना, तिनं लिहिलं, ''हे लिहिताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी. काल रात्री पहिला लाईव्ह गायनाचा परफॉर्मन्स झाला. माझ्यासाठी हे सर्वकाही आहे, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.'' यासोबतच परिणीतीनं हॅशटॅगमध्ये 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2024', एव्हरीवन इज इनव्हिटेड, गेटवे ऑफ ड्रीम्स आणि मुंबई फेस्टिव्हल पोस्टमध्ये जोडलं आहे.