महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सैफ अली खान हल्ला प्रकरण : मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन केला हल्ल्याचा सीन रिक्रिएट - SAIF ALI KHAN ATTACK CASE

अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्र्यातील घरात घुसून आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम यानं त्याच्यावर चाकू हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून हल्ल्याचं रिक्रिशन करुन घेतलं.

SAIF ALI KHAN ATTACK CASE
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2025, 7:49 AM IST

Updated : Jan 21, 2025, 8:34 AM IST

मुंबई :अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला घेऊन बांद्रा पोलिसांनी सोमवारी रात्री हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला. यावेळी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला पोलिसांनी घटनास्थळावर नेत त्यानं हल्ला कसा केला, याची मोडम ऑपरेंडी समजून घेत पुरावे गोळा केले. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम हा बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात येत असून तो ठाण्यात राहत असल्याचं उघड झालं. त्यामुळे सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती उघड होत आहे.

पोलिसांनी आरोपीला नेलं घटनास्थळावर :बांद्रा पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी नॅशनल कॉलेज बस स्टॉपवर आणलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून त्यानं हल्ला कसा केला, याबाबत जाणून घेतलं. त्यानंतर त्याला घेऊन पोलीस सैफ अली खान याच्या घरी गेले. सैफ अली खानच्या घरी जाऊन पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याच्याकडून हल्ल्याचं रिक्रिएशन करुन घेतलं.

पोलिसांनी नोंदवला करीना कपूरचा जबाब :अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं चाकू हल्ला केला. त्यामुळे सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा घरात कसा घुसला, याबाबत मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी सैफ अली खान याची पत्नी तथा अभिनेत्री करीना कपूर खान हिला अगोदर विचारपूस करण्यात आली. मात्र आरोपी मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा करीना कपूर खान हिला जबाब देण्यासाठी बोलवलं. मुंबई पोलीस सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. सैफवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीच्या मोबाईलमध्ये काय सापडलं? पोलिसांवरच ठेवायचा लक्ष
  2. वडील सैफ अली खानला भेटण्यासाठी तैमूर-जेह रुग्णालयात, करीना कपूर, सोहा-कुणाल देखील झाले स्पॉट...
  3. सैफ अली खानच्या हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी; आंतरराष्ट्रीय धागेदोरे?
Last Updated : Jan 21, 2025, 8:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details