मुंबई Deepika Padukone and Mukesh Ambani : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग 8 सप्टेंबर रोजी पालक झाले आहेत. दीपिकानं एका मुलीला जन्म दिला आहेत आता 'दीपवीर'च्या घरी आनंदाचे वातावरण आहे. एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दीपिका सध्या आहे. दीपिका आणि रणवीर अजूनही रुग्णालयात असून त्यांना नातेवाईक भेटण्यासाठी येत आहेत. काल रात्री रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी रुग्णालयात पोहोचून दीपिकाच्या नवजात बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुकेश अंबानी हे कारमध्ये हॉस्पिटल बाहेर दिसले.
मुकेश अंबानी यांनी दिली दीपिकाच्या बाळाला भेट : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी हे हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत. त्यांच्या कारबरोबर बाकी काही गाड्या देखील दिसत आहेत. दरम्यान दीपिका लग्नाच्या 6 वर्षानंतर आई झाली आहे. 'दीपवीर'नं 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. यापूर्वी रणवीर आणि दीपिकानं 2012 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. दोघांची भेट संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटात सेटवर झाली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून दोघांची जोडी हिट ठरली. यानंतर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय केला.