महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त महेश बाबूच्या आवाजासह 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर प्रदर्शित - Mufasa The Lion King - MUFASA THE LION KING

Mufasa The Lion King Telugu Trailer: डिस्ने चित्रपट 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर आज, 26 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. महेश बाबूनं मुफासाच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. तसंच आता या चित्रपटाचा ट्रेलर महेश बाबूची पत्नी आणि मुलीनं देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Mufasa The Lion King Telugu Trailer
मुफासा: द लायन किंग तेलुगु ट्रेलर (मुफासा पोस्टर-महेश बाबूचं कुटुंब (@DisneyStudiosIN Twitter-ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 6:36 PM IST

मुंबई Mufasa The Lion King Telugu Trailer: 'मुफासा: द लायन किंग'च्या निर्मात्यांनी आज, 26 ऑगस्ट रोजी चित्रपटाचा तेलुगु ट्रेलर रिलीज केला आहे. साऊथ अभिनेता महेश बाबूनं चित्रपटाच्या तेलुगु व्हर्जनमध्ये मुफासासाठी आपला आवाज दिला आहे. यापूर्वी, निर्मात्यांनी 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीत लॉन्च केला होता. सोमवारी महेश बाबूनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगु आवृत्तीचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्हाला माहीत असलेल्या आणि आवडत्या व्यक्तिरेखेचा एक नवीन आयाम. तेलुगुमध्ये मुफासाचा आवाज बनण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. क्लासिक्सचा मोठा चाहता असल्यानं माझ्यासाठी ही खास गोष्ट आहे. राजाचा जयजयकार."

नम्रता शिरोडकरनं केलं महेश बाबूचं केलं कौतुक :याशिवाय महेश बाबूची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर अपलोड करून पतीचं कौतुक केलं आहे. तिनं इंस्टाग्रामवर 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "आमच्या घराचा राजा आता जंगलाचा राजा झाला आहे. तुम्हाला तेलुगुमध्ये मुफासाचे जीवन वर्णन करताना पाहून अभिमान वाटतो." चित्रपटाच्या ट्रेलरला महेश बाबूची मुलगी सितारानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "तेलुगुमध्ये मुफासा म्हणून तुम्हाला ऐकण्याची प्रतीक्षा करू शकत नाही."

'मुफासा: द लायन किंग' चित्रपटाबद्दल :चाहत्यांना खूश करण्यासाठी या चित्रपटात अनेक प्रतिभावान स्टार्सनी आपला आवाज दिला आहेत. पुरस्कार विजेते गीतकार लिन-मॅन्युएल मिरांडा यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. 'मुफासा: द लायन किंग'ची निर्मिती मार्क मॅनसिना आणि मिरांडा यांनी केली आहे. अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा - द रुल' या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. अनेकजण महेश बाबूच्या पोस्टला लाईक करून चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करत असल्याचं सांगताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. महेश बाबू तेलुगू व्हर्जनमध्ये 'मुफासा द लायन किंग'साठी व्हॉईस ओव्हर करणार, 'या' दिवशी होईल ट्रेलर रिलीज - MAHESH BABU
  2. 'मुफासा: द लायन किंग'चा हिंदी व्हर्जनमधला ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - MUFASA THE LION KING
  3. 'द लायन किंग'चा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - mufasa the lion king trailer out

ABOUT THE AUTHOR

...view details