मुंबई - Mrunal Thakur : सीता रामम फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मोस्ट अवेटेड फॅमिली ड्रामा 'फॅमिली स्टार' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मृणालनं हैदराबादमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या श्री यल्लम्मा पोचम्मा देवस्थानमला भेट दिली. सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मृणाल लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. व्हिडिओत मृणाल मंदिरात हात जोडून पूजा करत आहे. त्यावेळी तिच्या आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी जमलेली होती. मृणालची यल्लमा भक्ती पाहून चाहते प्रभावित झाले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.
'फॅमिली स्टार'ची स्टार कास्ट : याशिवाय 'फॅमिली स्टार' चित्रपटाची टीम देखील तिच्याबरोबर आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'फॅमिली स्टार' चित्रपटामधील 'कल्याणी वछा वछा' हा दुसरा ट्रॅक रिलीज करण्यात आला होता. हा ट्रॅक अनेकांना आवडला आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित, 'फॅमिली स्टार' चित्रपटामध्ये वासुकी, रोहिणी हट्टंगडी आणि रवि बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्नाची देखील खास भूमिका असणार आहे. 'फॅमिली स्टार' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 एप्रिल 2024 रोजी तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.