महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मिसेस माही जान्हवी कपूरचं क्रिकेट बॉल हॅन्ड बॅगमधील क्लीन बोल्ड लूक व्हायरल - mrs mahi janhvi kapoor - MRS MAHI JANHVI KAPOOR

Mr. & Mrs. Mahi :'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.

Mr. & Mrs. Mahi
मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही (जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor - Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 4:55 PM IST

Updated : May 21, 2024, 5:11 PM IST

मुंबई - Mr. & Mrs. Mahi :अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव सध्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटाच्या रिलीजला फारसा वेळ उरलेला नाही. सध्या जान्हवी आणि राजकुमार 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता ती क्रिकेट स्टाइल लूकमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. जान्हवी आज लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली.तिच्या हातात लाल क्रिकेट बॉलची हँडबॅग होती. जान्हवीचा हा लूक खूप आकर्षक होता. दरम्यान 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'च्या या जोडप्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे जाऊन मंदिरात दर्शन घेतलं. त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

जान्हवी आणि राजकुमारला वाराणसी आवडलं :'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला चित्रपट राजकुमार आणि जान्हवी यांना वाराणसी खूप आवडले. सोमवारी दोघांनी बोटीतून गंगा घाट पाहिला. जान्हवी आणि राजकुमारनं गंगा आरतीला उपस्थित राहून लस्सी देखील चाखली. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा चित्रपट एका विवाहित जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना क्रिकेट पाहणे आणि खेळणे आवडते. हे जोडपे कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्या इच्छा दाबून ठेवतात. पुढे दोघेही त्यांच्या मनाचे ऐकतात आणि मिस्टर माही मिसेस माहीला मैदानात उतरवून दोघांची स्वप्ने पूर्ण करतो. या चित्रपटाचं शीर्षक हे महेद्र सिंग धोनीला समर्पित आहे.

जान्हवी आणि राजकुमारचा लूक : दरम्यान या दोघांच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी सुंदर निळ्या आणि सिल्वर रंगसंगतीची साडी नेसली आहे. याशिवाय तिनं फुलांचा गजरा केसात माळला आहे. लाईट मेकअपसह सुंदर टिकली तिनं कपाळावर लावून ती खूप आकर्षक दिसत आहे. दुसरीकडे राजकुमारनं पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' निर्मिती करण जोहरनं केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं आहे. हा चित्रपट 31 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. दरम्यान जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'देवरा पार्ट 1', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय राजकुमार हा 'स्त्री 2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. विक्रांत मॅसी स्टारर 'ब्लॅकआउट' टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ... - Vikrant massey and mouni roy
  2. अरबाज खाननं कार ड्राईव्ह करताना पत्नीसाठी गायलं गाणं, व्हिडिओ व्हायरल - arbaaz khan
  3. कतरिना कैफ आणि विकी कौशल लंडनमध्ये घेत आहे सुट्टीचा आनंद, व्हिडिओ व्हायरल - katrina kaif and vicky kaushal
Last Updated : May 21, 2024, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details