मुंबई - Mouni Roy Wedding Anniversary:अभिनेत्री मौनी रॉय आज 27 जानेवारीला तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. मौनीनं 2022 मध्ये उद्योगपती सूरज नांबियारशी लग्न केलं. आज 27 जानेवारीला मौनी रॉयच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत असलेल्या मौनी रॉयनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे लग्नाचे काही विधी करताना दिसत आहेत. याशिवाय काही फोटोत दोघंही सुखी संसाराचा आनंद घेताना दिसत आहेत. मौनीच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
मौनी आणि सूरजनं दिल्या शुभेच्छा :हे फोटो शेअर करताना मौनी रॉयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''लग्नाचे दोन वर्षे, 730 दिवसांच्या असंख्य आठवणी, 63,072,000 सेकंद माझे बोलणे तू ऐकत आहेस, हॅपी एनिवर्सरी बेबी'. दरम्यान सूरजनेही हीच पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे आणि पत्नी मौनी रॉयला शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्याच्या लग्नामधील फोटो खूप सुंदर आहेत. पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोत मौनी आणि सूरज एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सूरज मौनी हा लग्नामधील विधी करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो चाहताना खूप आवडले आहेत.