नवी दिल्ली - भारतीय चित्रपटसृष्टीतील अद्वितीय योगदानाची दखल घेऊन ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मिथुनदा यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी भाषांमधील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आज राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुनदा यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च जीवन गौरव सन्मान देऊन गौरव केला.
यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांचा पहिला चित्रपट 'मृगया'साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचे 1980 आणि 90 च्या दशकातील अनेक चित्रपट हिट झाले आहेत. अॅक्शन आणि डान्सवर आधारित असलेले त्यांचे चित्रपट अनेकांना या काळात पसंत पडले होते. 1982मध्ये 'डिस्को डान्सर' या सुपरहिट चित्रपटाद्वारे त्यांना देशभरात ओळख मिळाली. दरम्यान त्यांचा 'अग्निपथ','प्यार झुकता नहीं', 'गुंडा', 'द ताशकंद फाइल्स' या चित्रपटामधील अभिनय हा खूप दमदार होता. त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार 1992मधील चित्रपट 'तहादेर कथा'साठी मिळाला आहे. याशिवाय तिसरा राष्ट्रीय पुरस्कार 1998मध्ये आलेल्या 'स्वामी विवेकानंद' चित्रपटासाठी त्यांना मिळाला आहे. 2024मध्ये त्यांना 'पद्मभूषण' या देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं. ते फक्त चित्रपटांमध्येच नाही, तर टीव्ही शो आणि राजकारणातही सक्रिय आहेत.
नवी दिल्लीत पार पडलेल्या 70 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माते, अभिनेते आणि अभिनेत्रींचा गौरव करण्यात आला. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऋषभ शेट्टी (कंतारा), नित्या मेनन आणि मानसी पारेख यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी, अट्टमची सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी निवड करण्यात आली होती.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्या प्रतिभावंतांचा सन्मान झाला असे कालाकार आणि त्यांच्या कलाकृती पुढील प्रमाणे आहेत.
(फीचर फिल्म श्रेणी)
सर्वोत्तम अभिनेता
ऋषभ शेट्टी (कंतारा)
सर्वोत्तम चित्रपट
गुलमोहर (मनोज बाजपेयी)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म
आत्मा (द प्ले)-(मल्याळम)
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट
फौजा (हरियाणवी)
उत्तम मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट
कंतारा (कन्नड)
राष्ट्रीय, सोशल मीडिया आणि पर्यावरणीय मूल्याचा प्रचार करणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म
कच्छ एक्सप्रेस (गुजराती)
EVGC मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट (ॲनिमेटेड, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग किंवा कॉमिक)
ब्रह्मास्त्र भाग १: शिव (हिंदी)
सर्वोत्तम दिशा
उंचाई (झेनिथ)- हिंदी
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
कंतारा (कन्नड)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
नित्या मेनन (तिरुचित्रंबलम, तमिळ)
मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस, गुजराती)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
पवनराज मल्होत्रा (फौजा, हरियाणवी)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
नीना गुप्ता (उंचाई)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
श्रीपत (मलिकापुरम, मल्याळम)
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक
अरिजित सिंग (केशर, ब्रह्मास्त्र- भाग १: शिव (हिंदी))
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका
सासौदी वेलंका सीसी, सौदी बेबी कोकोनट (मल्याळम)
गायिका-बॉम्बे जयश्री (छायुम वेईल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
पोन्नियन सेल्वन भाग १ (तमिळ)
सिनेमॅटोग्राफर - रवि वर्मन
सर्वोत्कृष्ट पटकथा
पटकथा लेखक (मूळ)
अट्टम (नाटक): आनंद एकाराशी
संवाद लेखक
गुलमोहर : अर्पिता मुखर्जी आणि राहुल व्ही चित्तेला
सर्वोत्तम ध्वनी डिझाइन
पोन्नियन सेल्वन भाग १ (तमिळ)
साउंड डिझायनर: आनंद कृष्णमूर्ती