मुंबई :ओटीटीची जगातील सर्वात लोकप्रिय क्राइम ड्रामा वेब सीरीज 'मिर्झापूर' आता मोठ्या पडद्यावर म्हणजेच थिएटरवर येत आहे. 'मिर्झापूर द फिल्म'ची आज 28 ऑक्टोबर रोजी घोषणा करण्यात आली आहे. आता कलेन भैया, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या चित्रपटगृहांमध्ये 'मिर्झापूर द फिल्म'द्वारे खळबळ माजवणार आहे. एक्सेल मुव्हीजनं आपल्या सोशल मीडियावर 'मिर्झापूर द फिल्म' या चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. 'मिर्झापूर द फिल्म'च्या स्टारकास्टसह दिग्दर्शक आणि चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर 'मिर्झापूर द फिल्म'चा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे.
मुन्ना भैय्या मोठ्या पडद्यावर 'मिर्झापूर द फिल्म'द्वारे माजवणार खळबळ, टीझर व्हायरल - MIRZAPUR THE FILM TEASER OUT
पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा स्टारर 'मिर्झापूर' आता मोठ्या पडद्यावर म्हणजेच थिएटरवर प्रदर्शित होणार आहे. टीझर निर्मात्यांनी शेअर केलंय.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Oct 28, 2024, 12:55 PM IST
'मिर्झापूर द फिल्म'चा टीझर प्रदर्शित : या टीझरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी त्यांच्या डॅशिंग आणि दमदार अंदाजात दिसत आहेत. 'मिर्झापूर द फिल्म'चा टीझर पंकज त्रिपाठी (कालिन भैया)च्या सुंदर आवाजाने सुरू होतो. यानंतर गुड्डू पंडित टीझरमध्ये एंट्री करतो. यानंतर सर्वात धक्कादायक एन्ट्री मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा)ची आहे. याशिवाय मुन्ना भैय्याबरोबर कंपाउंडरच्या भूमिकेत अभिषेक बॅनर्जी देखील दिसतो. आता 'मिर्झापूर द फिल्म' टीझर हा अनेक चाहत्यांना आवडत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर असल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियावर या टीझरचे अनेकजण कौतुक करत आहेत.
'मिर्झापूर द फिल्म' टीझर : चित्रपटाच्या टीझरमध्ये पंकज त्रिपाठी म्हणतात, "तुम्हाला या सिंहासनाचे महत्त्व, आदर, शक्ती, नियंत्रण माहित आहे, आतापर्यंत तुम्ही 'मिर्झापूर'ला तुमच्या गादीवर बसून पाहिले असेल, परंतु यावेळी तुम्ही सिंहासनातून उठला नाही तर धोका आहे." 'मिर्झापूर द फिल्म'च्या 1.33 मिनिटांच्या टीझरमध्ये पंकज त्रिपाठीनंतर अली फजल गुड्डू पंडितच्या भूमिकेत एंट्री करून म्हणतो, "बरोबर बोले कलेन भैया, रिस्क घेणे ही आमची यूएसपी आहे, आता जे काही आहे ते संपूर्ण खेळ बदलेल. आता 'मिर्झापूर' तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला 'मिर्झापूर'ला यावं लागेल." अली फजल नंतर दिव्येंदू शर्मा मुन्ना भैयाच्या रुपात एंट्री करतो आणि तो म्हणतो, "मी हिंदी चित्रपटाचा अभिनेता आहे. हिंदी चित्रपट फक्त थिएटरमध्येच पाहिला जातो, म्हटलं होतं ना मी अमर आहे. आता मिर्झापूरच्या गादीवर इथे बसून राज्य होईल धार तीक्ष्ण आहे, नाही कंपाउंडर." (अभिषेक बॅनर्जी) यावर म्हणतो, ''फर्स्ट शो ते लास्टपर्यत," यानंतर पंकज त्रिपाठी म्हणतात. "आता जागा मोठी होईल आणि पडदाही." या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना यावेळी खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे.