मुंबई - Met Gala 2024 :विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या वेगवेगळ्या कल्पनाद्वारे ड्रेस तयार करत असते. दरम्यान मेट गाला 2024 सुरू झाला आहे. आता या कार्यक्रमात उर्फीच्या डिझायनर ड्रेसची कल्पना चोरीला गेली आहे. मॉडेल अमेलिया ग्रे हॅमलिननं यावर्षी मेट गालामध्ये पदार्पण केलं. तिनं या कार्यक्रमात लाइट-अप टेरेरियम ड्रेस परिधान केला. आता तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी असाच ड्रेस हा उर्फीनं घातला होता. यानंतर तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
मेट गालामध्ये उर्फीच्या ब्रह्मांड ड्रेसची दिसली झलक :दरम्यान मेट गालामध्ये अमेलिया ग्रे हॅमलिननं असाच ड्रेस घातल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर उर्फीचे कौतुक करत आहेत. आता अमेलिया ग्रे हॅमलिन आणि उर्फी जावेदच्या युनिव्हर्स ड्रेसशी तुलना केली जात आहे. अमेलियानं मेट गालामध्ये हजेरी लावली असून सध्या हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी उर्फीनं ब्रह्मांड ड्रेस डिझाइन केला होता. उर्फीनं तिच्या या पोशाखात वेगवेगळे ग्रह लावले होते , हे ग्रह दिव्यांनी हलत होते. हा अनोखा ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं होत, "सेंटर ऑफ द ब्रह्मांड." तिच्या विज्ञान प्रकल्पाच्या ड्रेसची खूप प्रशंसा सोशल मीडियावर झाली होती. तिचा हा ड्रेस अनेकांना आवडला होता.