महाराष्ट्र

maharashtra

विक्रांतच्या 'ट्वेल्थ फेल' आणि कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन'नं इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये केली जादू - kartik won best actor

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 1:42 PM IST

Melbourne Film Festival: इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2024मध्ये बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सची सध्या धूम आहे. आता या अवार्डमधील विजेत्यांची संपूर्ण यादी ही समोर आली आहे.

Melbourne Film Festival
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल (मेलबर्न फिल्म फेस्टिवल 2024 (Film Posters))

मुंबई - Melbourne Film Festival 2024 :इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (IFFM)2024 पुरस्कारांची घोषणा 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली. 15व्या (IFFM)ची औपचारिक सुरुवात 15 ऑगस्ट रोजी झाली. या चित्रपट महोत्सवात अनेक भारतीय चित्रपट, वेब सीरीज, अभिनेते आणि दिग्दर्शकांना सन्मानित करण्यात आले. साऊथ मेगास्टार राम चरणला अ‍ॅम्बेसिडर ऑफ इंडियन आर्ट अ‍ॅन्ड कल्चरलचा अवार्ड मिळाला आहे. विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून कार्तिक आर्यनला 'चंदू चॅम्पियन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच किरण रावच्या 'लापता लेडीज'ला बेस्ट फिल्म क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड मिळाला आहे.

विजेत्यांची संपूर्ण यादी पाहूया.

सर्वोत्कृष्ट कामगिरी (पुरुष) : कार्तिक आर्यन, 'चंदू चॅम्पियन'

सर्वोत्कृष्ट कामगिरी (महिला): पार्वती थिरुवोथु, 'उलोझुक्कू'

सर्वोत्कृष्ट चित्रपट: 'ट्वेल्थ फेल'

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: कबीर खान, 'चंदू चॅम्पियन' आणि निथिलन स्वामीनाथन, 'महाराजा'

सर्वोत्कृष्ट क्रिटीक्स चॉइस: विक्रांत मॅसी, 'ट्वेल्थ फेल'

अ‍ॅम्बेसिडर ऑफ इंडियन आर्ट अ‍ॅन्ड कल्चर : राम चरण

सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटीक्स चॉइस: 'लापता लेडीज'

सर्वोत्कृष्ट वेब सीरीज: 'कोहरा'

सिनेमातील समानता: 'डंकी'

पीपल्स चॉइस: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'

सिनेमातील उत्कृष्टता: एआर रहमान

ब्रेकआऊट फिल्म ऑफ द इयर: 'अमर सिंह चमकीला'

सर्वोत्कृष्ट कामगिरी (महिला वेब सीरीज): निमिषा सजयन ('पोचर'साठी)

सर्वोत्कृष्ट कामगिरी( पुरुष वेब सीरीज): अर्जुन माथुर ('मेड इन हेवन सीजन 2'साठी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिटिक्स चॉइस : डोमिनिक संगमा ('रॅप्चर'साठी)

चित्रपट महोत्सवात 'या' स्टार्सनं लावली हजेरी : इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (IFFM 2024)ची सुरुवात ही पत्रकार परिषदेनं झाली होती. यामध्ये कार्तिक आर्यन, करण जोहर, कबीर खान, इम्तियाज अली, शूजित सरकार, आदर्श गौरव, रीमा दास, लक्ष्य आणि सोना मोहपात्रा यांसारखे अनेक स्टार्स उपस्थित होते. हा महोत्सव 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत राहिल. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि साऊथकडील स्टार उपस्थित आहेत. यापूर्वी मेलबर्नवरून करण जोहर आणि राणी मुखर्जीचे काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये हे दोघेही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजबरोबर दिसले होते.

हेही वाचा :

  1. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी करण जोहर आणि राणी मुखर्जीनं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट - Karan Johar and Rani Mukerji

ABOUT THE AUTHOR

...view details