महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away - AMOL KALE PASS AWAY

Amol Kale pass away : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेता सोनू सूदनं आपला मित्र हरपल्याचं म्हटलंय. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे.

Amol Kale pass away
सोनू सूद आणि अमोल काळे (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 9:59 AM IST

Updated : Jun 11, 2024, 2:41 PM IST

मुंबई - Amol Kale pass away : अभिनेता सोनू सूदनं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोनूनं सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अमोल काळेंचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "माझ्या भावा, तू तिथं नाहीस यावर विश्वास बसत नाही. मला तुझी नेहमीच आठवण येईल. आयुष्यात योग्य झालं नाही, अमोल भाई."

सोनू सूद पोस्ट (Instagram)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोमवारी काळे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. "माझ्या भाषणादरम्यान मला या दुःखद घटनेची माहिती मिळाली. अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांचे निधन झाले. हे दुर्दैवी आहे... घडलेल्या प्रकाराची माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न करत आहे... मी शोक व्यक्त करतो..." असं पवार माध्यमाशी बोलताना म्हणाले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सोमवारी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक निवेदन जारी केलं आहे. "आमचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या अनपेक्षित जाण्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. सर्वोच्च परिषदेच्या वतीने आमचे सदस्य क्लब, कर्मचारी सदस्य आणि संपूर्ण एमसीए परिवार यांना अमोल काळे यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि प्रयत्न आमच्या अंतःकरणात कायम स्मरणात राहतील, आम्ही त्यांच्या कुटुंबासाठी मनापासून संवेदना व्यक्त करत आहोत," असं एमसीएच्या मनिवेदनात म्हटलंय.

२०२२ मध्ये निवडून आल्यानंतर अमोल काळे यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्यकाळ होता. त्यांच्या कार्यकाळातच एमसीएने 2024-25 च्या मोसमात आपल्या वरिष्ठ पुरुष क्रिकेटपटूंना 100 टक्के वेतनवाढ देण्याचं मान्य केलं. एमसीएच्या नुकत्याच झालेल्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. या निर्णयामुळे संपूर्ण हंगामात खेळाडूची कमाई दुप्पट होणार आहे.

त्यांच्या कार्यकाळातील इतर ठळक वैशिष्ट्ये: सचिन तेंडुलकरचा पुतळा गेल्या वर्षी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यात आलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीसह काही आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यांचे या प्रतिष्ठित ठिकाणावर आयोजन करण्यात आलं होतं.

क्रिकेटच्या मैदानावर मुंबईच्या खेळाडूंनी वानखेडे येथे रंगलेल्या विजेतेपदाच्या लढतीत विदर्भाचा पराभव करून विक्रमी 42 व्या रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं होतं. याचा एमसीए आणि अमोल काळे यांना अभिमान वाटला होता.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death
  2. मोस्ट अवेटेड चित्रपट "कल्की 2898 एडी"चा ट्रेलर अखेर रिलीज; प्रभास दिसतोय डॅशिंग अवतारात - Kalki 2898 AD Trailer
  3. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्किस' चित्रपटासाठी सज्ज, केली पोस्ट शेअर - agastya nanda share pic
Last Updated : Jun 11, 2024, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details