मुंबई - Malaika Arora and Arjun Kapoor:अभिनेत्री मलायका अरोरानं आज 26 जून रोजी अर्जुन कपूरच्या 39व्या वाढदिवसानिमित्त एक क्रिप्टो पोस्ट शेअर केली आहे. मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. काल रात्री, मलायका अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित न राहिल्यानं ब्रेकअपच्या अफवांना उधाण आलंय. मलायकानं अद्याप अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. मात्र तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, "मला असे लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकते." मलायकानं या पोस्टवर कोणतेही कॅप्शन दिलेले नाही.
मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप :मलायका आणि अर्जुननं 2019 मध्ये त्यांच्या डेटिंग लाइफला अधिकृत केलं होतं. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही अजून लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. नुकतेच दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. मात्र, अर्जुन आणि मलायका या दोघांनीही या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. मलायकाच्या मॅनेजरनं या ब्रेकअपच्या अफवांचं सातत्यानं खंडन केलं आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व अफवा आहेत, असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं.