मुंबई - Salman Khan met Malaika Arora : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार्स तिच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत. मलायकाच्या आईच्या घरी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी भेट देत आहेत. मलायका आणि तिच्या कुटुंबीयांवर बुधवार 11 सप्टेंबर रोजी दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या कठीण काळात मलायका अरोराच्या आईच्या घरी आता सलमान खाननं भेट दिली. गुरुवारी, 12 सप्टेंबरला सलमान खान कडेकोट बंदोबस्तात सलमान आपला भाऊ अरबाजच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला धीर देण्यासाठी पोहोचतला. दोघं सात वर्षांच्या कालखंडानंतर एकमेकांना भेटले असल्याची चर्चा आहे.
सलमान खान भेटला मलायका अरोराला :सलमान खानच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य अरोरा कुटुंबाला धीर देण्यासाठी पोहोचले. अनिल मेहता यांच्या मृत्यूनंतर मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खाननं घटनास्थळी पोहचून पोलिसांबरोबर संवाद साधला होता. यानंतर सोहेल खान, सलीम खान, सलमान खानची आई सलमा, अर्पिता, अलविरा आदी सदस्यदेखील मलायकाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले. मलायका आणि अरबाज विभक्त झाल्यानंतर सलमान मलायकावर रागवला असल्याची चर्चा होती. त्यात अर्जुन कपूरबरोबरच्या मलायकाच्या जवळीक त्याला खटकत होती, अशीही चर्चा आहे. मात्र मलायकाचं पितृछत्र हरपल्यानंतर सलमान तिला भेटायला गेल्यामुळे सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा होत आहे. घटनास्थळावरून 'भाईजान'चे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सलमान खान त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.