मुंबई - Malaika Arora Father Funeral :अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कथितरीत्या उडी मारुन आत्महत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर मलायकाच्या घरी अनेक चित्रपटसृष्टीतील स्टार्स तिचं सांत्वन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान अनिल मेहता यांच्यावर आज 12 सप्टेंबर रोजी सांताक्रूझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मलायका अरोरा ही आई जॉयस पॉलीकार्प आणि मुलगा अरहान खानसह तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरातून निघाली. अरोरा कुटुंबाचं घर सोडतानाचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पापाराझींनी मलायकाच्या घरातील अरोरा कुटुंबाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
मलायका अरोरा आई जॉयस पॉलीकार्प झाली स्पॉट : या व्हिडिओमध्ये मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प या खूप रडताना दिसल्या. या कठीण काळात त्यांचा नातू अरहान त्यांना आधार देत गाडीपर्यंत घेऊन जाताना दिसला. मलायकानं मीडियापासून तिचे अश्रू लपवण्यासाठी काळा सनग्लास लावला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मलायकाची बहीण-अभिनेत्री अमृता अरोरा तिच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. या क्लिपमध्ये अमृता ही तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाबरोबर जाताना दिसत आहे.