महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मलायकाचा मुलगा अरहानच्या वाढदिवसाला अरबाज नवी पत्नी शशुरा खानसह हजर - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY

ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY : मलायका अरोरा आणि अरबाज खान मुंबईत त्यांचा मुलगा अरहान खानच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले होते. या पार्टीत अरबाज त्याची सध्याची पत्नी शशुरा खान बरोबर हजर होता. या वाढदिवसाला अरबाजचे वडील सलीम खान, मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प, बहिण अमृता अरोरा आणि अरबाजची मैत्रीण रवीना टंडनही हजर होती.

ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY
अरहान खान वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 9:55 AM IST

मुंबई - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY : मलायका अरोरा आणि तिचा माजी पती अरबाज खानचा मुलगा अरहान खान याचा वाढदिवस मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये साजरा झाला. यावेळी अरहानचे आई वडील मलायका आणि अरबाज तर हजर होतेच पण त्याची सावत्र आई आणि अरबाजची आताची पत्नी शशुरा खानही उपस्थित होती. या कार्यक्रमाला अरहानचे आजोबा आणि महान पटकथा लेखक सलीम खानदेखील हजर होते. खूप काळानंतर मुलाच्या वाढदिवसानिमित्त अरबाज आणि मलायका एकत्र आले होते.

मुंबईच्या वांद्रे येथील एका प्रतिष्ठीत रेस्टॉरंटमध्ये हा चमकता वाढदिवस सोहळा दिमाखात पार पडला. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी अरहानची आजी आणि मलायकाची आई जॉयस पॉलीकार्पही हजर होती. मलायकाची बहिण अमृता अरोरा आणि तिचा मुलगा अझानही कार्यक्रमात सामील झाले.

अरहानच्या बर्थडे पार्टीत भाग घेण्यासाठी अरबाज पत्नी शशुरासह कार्यक्रमस्थळी आनंदात पोहोचला. यावेळी मलायका पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिनं आईच्या बरोबर सुंदर पोझ देऊन फोटो काढले. या कार्यक्रमाला अरबाजची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री रवीना टंडन देखील सामील होती.

शशुरा खानने काळा पोशाख परिधान केला होता. अरबाजनेही पत्नीच्या ड्रेसला मॅचिंग होईल असा शर्ट आणि निळ्या डेनीममध्ये स्वतःला सजवले होते. अरहानचा वाढदिवसासाठी मलायका, अरबाज आणि शशुरा एकत्र आले असले, तरी त्यांनी एकमेकांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं.

अरबाजने मेकअप आर्टिस्ट शशुरा खानच्या बरोबर गेल्या वर्षी 24 डिसेंबरला निकाह केला. त्याची बहिण अर्पिता खान शर्माच्या घरी त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे वडीलांच्या लग्नामध्ये अरहान खानही हजर होता आणि त्यानं यावेळी जोरदार डान्सही केला होता. शशुराबरोबर लग्नापूर्वी अरबाजचे मलायका अरोरा बरोबर लग्न झाले होते. त्यांना अरहान हा एक मुलगा आहे. या जोडप्याचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. सध्या मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर डेटिंग करतात. ही जोडी अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमस्थळी बिनधास्त एकत्र फिरताना दिसतात. ते लवकरच विवाहबंधनात अडकतील असे अंदाज बांधले जातात.

हेही वाचा -

  1. "प्रिये, दोन अर्जुन कशी सांभळशील?" म्हणत अल्लु अर्जुननं केला पत्नीला सवाल - ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI
  2. ७० एमएम स्क्रीनची मजा ७० सेंटीमीटरच्या मोबाईल स्क्रीनवर मिळणार नाही! : श्रुती मराठेची खास मुलाखत - interview with Shruti Marathe
  3. ‘वहिनी नमस्कार’ म्हणताच आलिया भट्ट लाजून झाली गोरी मोरी, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt at Mumbai airport

ABOUT THE AUTHOR

...view details