मुंबई - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अनेकांना आवडतो. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षक खळखळून हसतात. सध्या या कार्यक्रमाची जगभरात चर्चा आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला भारताबाहेरही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम लंडनमध्ये पाहता येईल. अभिनेता समीर चौघुले यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे. समीर चौघुले यांचे विनोद लाखो चाहत्यांना आवडते. आता त्यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाबद्दल एक माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम लंडनमध्ये पाहता येईल, समीर चौघुलेनं केली पोस्ट शेअर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता लंडनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. समीर चौघुलेनं सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : 4 hours ago
लंडनमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहता येईल : समीर चौघुले यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम थेट लंडनमध्ये पाहता येणार, याबद्दलची पुष्टी केली. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरून लंडनमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल असं समजत आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता बेक थिएटरमध्ये पहिला शो होईल. यानंतर 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता, शॉ थिएटर, सेंट्रल लंडन येथे दुसरा शो पाहाता येईल. या दोन्ही शोसाठी मर्यादीत बुकिंग होईल. बेक आणि शॉ थिएटरमधील शो पाहण्यासाठी तिकिट कसे बुक करायचे याबद्दल समीर चौघुले यांनी माहिती इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिली आहे.
समीर चौघुले यांनी शेअर केलं पोस्टर : समीर चौघुले यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये नम्रता संभेराव, चेतना भट, प्रथमेश शिवलकर आणि प्रभाकर मोरे हे कलाकार दिसत आहेत. आता हे कलाकार लंडनमध्ये प्रेक्षकांना खूप हसविणार हे नक्की. लंडनमध्ये होणाऱ्या शोमध्ये 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा'मधील आणखी कोणते कलाकार असेल याबद्दल माहिती समोर आलेली नाही. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्रभाकर मोरे, चेतना भट नम्रता संभेराव याशिवाय अन्य सर्वच कलाकारांची स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान समीर चौघुलेनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर इमोजी शेअर करत आहेत.