महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नेटफ्लिक्सवर 'मामला लीगल है' वेब सीरीज 'या' दिवशी होणार रिलीज - रवी किशनचा कोर्टरुम ड्रामा

Maamla legal hai : रवी किशन अभिनीत 'मामला लीगल है' ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर लवकरच रिलीज होत आहे. ही वेब सीरीज कॉमेडी ड्रामा असणार आहे.

Maamla legal hai
मामला लीगल है

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 2:28 PM IST

मुंबई - Maamla legal hai : 'जॉली एलएलबी' सारखे कोर्टरूम ड्रामा कॉमेडी चित्रपट आवडत असतील तर आता ओटीटीवर एक जबरदस्त वेब सीरीज प्रदर्शित होत आहे. नेटफ्लिक्सवर रवी किशन स्टारर 'मामला लीगल है' प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. रवीची आगामी वेब सीरीज दिल्लीतील पटपरगंज येथील जिल्हा न्यायालयावर आधारित आहे. या वेब सीरीजचे निर्माते पोशम पा पिक्चर्स आहेत, जे 'जादूगर' आणि 'काला पाणी' यासारख्या वेब सीरीजसाठी ओळखले जातात. 'मामला लीगल है'चं दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केलं आहे. या वेब सीरीजच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये रवी किशन व्यतिरिक्त सौरभ खन्ना, निधी बिश्त, नाइला ग्रेवाल, अंजुम बत्रा विजय राजोरिया आणि कुणाल अनेजा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'मामला लीगल है' कॉमेडी वेब सीरीज असणार : या वेब सीरीजमध्ये रवी किशन पटपरगंज बार असोसिएशनचे अध्यक्ष व्हीडी त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याचं स्वप्न भारताचे ॲटर्नी जनरल होण्याचे आहे. जुगाडच्या कौशल्यानं, व्हीडी त्यागी आणि त्यांच्या वकिलांची टीम "कानूनी ईगल" या शब्दाला एक नवीन अर्थ देतात. 'मामला लीगल है' ही वेब सीरीज कायदेशीर खटले आणि कॉमेडी ड्रामा आहे. या वेब सीरीजमध्ये अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कोर्टरूमपासून निवडणुका आणि लोकशाहीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर आधारित या वेब सीरीजमध्ये रवी किशनचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

प्रीमियर या दिवशी होईल : 'मामला लीगल है' ही वेब सीरीज 1 मार्च रोजी रिलीज होईल. रवी किशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करू शकला नाही. मिशन राणीगंज' 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोलफिल्डवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केलंय. याशिवाय रवी आगामी 'लापता लेडीज'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. व्हॅलेंटाईन डे निमित्त गौरी खाननं खास जोडप्यांसाठी उघडलं नवं रेस्टॉरंट
  2. प्रियांका चोप्रानं दाखवली कुशीतील मालतीबरोबरची सुंदर झलक
  3. व्हॅलेंटाईन वीक आणखी रोमँटिक बनवा, ओटीटीवर पाहा हे चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details