मुंबई :अभिनेता इरफान खान असा अभिनेता होता, ज्यानं आपल्या अभिनयानं देशातच नाही तर परदेशातही एक ओळख निर्माण केली होती. भारतीय चित्रपटांपासून ते हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. इरफाननं न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी 2 वर्ष लढा दिला, मात्र 29 एप्रिल 2020 रोजी त्यानं मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान आज या जगात नसला, तरी तो त्याच्या चित्रपटातून आपल्यामध्ये जिंकत आहे. तसेच त्याच्या आयुष्यातील रंजक कहाणी देखील कायम आपल्यामध्ये राहिल. इरफान खानच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.
इरफान खानचा वाढदिवस : इरफान खाननं अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही किस्से सांगितले आहेत. यापैकी एका मुलाखतीत त्यानं त्याच्या आयुष्यातील अशा भागाबद्दल सांगितलं होतं, ज्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. एका मीडिया मुलाखतीत इरफानला विचारण्यात आलं होतं की, त्याच्या वडिलांची इच्छा काय होती. यावर इरफान म्हटलं, "त्यांना मला कठोर शिकारीसारखे बनवायचे होते. माझे वडील शिकारी होते, ते शिकार करायचे. आम्ही देखील त्याच्याबरोबर शिकारीला जायचो. आम्हाला शिकार करायला आणि जंगल बघायला खूप आवडायचं. जेव्हा प्राणी मरायचे, तेव्हा त्याच्या मुलाचे काय होत असेल, त्याच्या आईचे काय होत असेल, अशा कहाणी आम्ही बनवत होतो. यानंतर हे सर्व माझ्या मनात घोळ चालू असायचा."