मुंबई Lara Dutta : रणबीर कपूर स्टारर 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील लारा दत्ताचे काही फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटात ती कैकेयीची भूमिका साकारत असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपट निर्माते नितीश तिवारी यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नसलं तरी तिनं यावर आपले मत व्यक्त केलं आहे. लारानं दिलेल्या उत्तरानेही तिची या चित्रपटामध्ये काय भूमिका असले हे स्पष्ट झाले नाही. 'रामायण'मध्ये 'कैकेयी'ची भूमिका साकारण्याबद्दल लारा म्हटलं, "मी देखील एक अफवा खूप ऐकत आहे. मला अफवा वाचणे आणि ऐकणे देखील आवडते, म्हणून कृपया त्या चालू ठेवा. 'रामायण'चा भाग कोणाला व्हायचे नाही? त्यात अनेक पात्रे आहेत, मला ऑफर दिली असती तर, मी ती उत्साहानं साकारली असती." यानंतर लारा हसली आणि म्हणाली, 'रामायण'मध्ये अनेक पात्रे आहेत आणि मला कुठलीही भूमिकेची ऑफर आली तर मी करेल, मग ते शूर्पणखा असो किंवा मंदोदरी."
'नो एंट्री' चित्रपटाबद्दल केला लारानं खुलासा :अनीस बज्मीच्या 'नो एंट्री'बद्दल बोलताना लारानं सांगितलं, बॉबी सलुजाची भूमिकेमुळे बिपाशा बसूनं प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. मात्र लारा ही भूमिका ऑफर केली होती. या चित्रपटात एक नव्हे तर तिला दोन भूमिकांच्या ऑफर आल्या होत्या. तिला दोन पात्रांमधून एक भूमिका निवडायचे होते. तिनं बॉबी सलुजाची भूमिका नाकारली आणि काजल सिंघानियाची भूमिका करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात लारा अनिल कपूरची पत्नी बनली होती. यानंतर तिनं पुढं सांगितल, "मला चित्रपटसृष्टीत चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून माझी प्रतिष्ठा बळकट झाली. "