मुंबई - Lal Salaam Trailer OUT : अभिनेता रजनीकांतच्या आगामी 'लाल सलाम' या चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'लाल सलाम' या चित्रपटाचा ट्रेलर 5 फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आला. ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रजनीकांतचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट खूप आतुरतेनं पाहात होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं केलं आहे. 'लाल सलाम'मध्ये रजनीकांत हे मोईनुद्दीन भाई ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
'लाल सलाम' रिलीज डेट जाहीर : 'लाल सलाम'मध्ये रजनीकांत हे कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांतची अॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'लाल सलाम'ची रिलीज डेट 9 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. या चित्रपटाची डेट जाहीर करत एक पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी 8 मे रोजी 'लाल सलाम' या चित्रपटातील रजनीकांतचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. 'लाल सलाम'मधील रजनीकांतचा फर्स्ट लूक, जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेक जणांनी या पोस्टरवर कमेंट्स करत या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली होती.