मुंबई - Kriti Kharbanda Griha Pravesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट लग्नाच्या बेडीत 15 मार्च रोजी अडकले आहेत. या जोडप्यानं जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दिल्लीजवळील मानेसर येथील एका भव्य रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले आहेत. लग्नानंतर 16 मार्च रोजी संध्याकाळी क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट पहिल्यांदाच एकत्र दिसले. क्रिती लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घरी पोहोचली. तिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान, तिनं तिच्या केसांमध्ये, सिंदूर, मॅचिंग ज्वेलरी आणि हातात लाल बांगड्या घालल्या होत्या. प्रिंटेड लाल रंगाच्या साडीत क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.
पुलकित सम्राटही डॅशिंग लूक : व्हायरल व्हिडिओमध्ये पुलकित डॅशिंग दिसत आहे. यावेळी त्यानं पांढऱ्या रंगाच्या कुर्त्याबरोबर धोती परिधान केली आहे. व्हिडिओमध्ये पुलकित आणि क्रिती ढोल ताशांच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय क्रितीची सासू तिला ओवाळून पैसे देताना दिसत आहे. या जोडप्याच्या लग्नानंतर त्यांच्या घरचे काही भव्य स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय क्रिती आणि पुलकितनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्यानं त्यांच्या लग्नात खूप सुंदर लुक केला होता. क्रितीनं तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती.