मुंबई : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा द रुल'ची अनेकजण आतुरतेनं वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक रोमांचक अपडेट समोर आली आहे. साऊथ अभिनेत्री श्रीलीलानं अधिकृतपणे घोषणा केली आहे की, ती 'पुष्पा द रुल'चा भाग असणार आहे. या चित्रपटामध्ये ती एक आयटम साँग करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या या आयटम साँगचं नाव 'किसिक' असेल. 'पुष्पा द रुल'च्या निर्मात्यांनी श्रीलीलाचं एक पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. आता हे गाणं रुपेरी पडद्यावर रसिकांचे खूप मनोरंजन करेल असं सध्याचं चित्र दिसत आहे.
'द डान्सिंग क्वीन' श्रीलीलाची 'पुष्पा 2'मध्ये एंट्री : 'किसिक' गाणं आता पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. 'द डान्सिंग क्वीन श्रीलीला'नं सध्या या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान 'पुष्पा द राइज' चित्रपटांमध्ये अनेक खास गाणी आहेत. 'पुष्पा द राइज'मधील 'ऊ अंटावा' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामध्ये साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभुनं धमाकेदार डान्स केला होता. 'ऊ अंटावा'ला मिळालेल्या पसंतीमुळे सुकुमार हे 'पुष्पा द रुल'मध्ये असेच गाणं तयार करत आहे. या गाण्यामध्ये श्रीलीलाला संधी दिल्यानंतर आता तिचे चाहते देखील खुश आहेत.