मुंबई - Kiran Rao:अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सध्या तिच्या आगामी 'लापता लेडीज ' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. तिला या चित्रपटासाठी आमिर खाननं पाठिंबा दिला आहे. आमिर खान आणि किरण राव 'लापता लेडीज ' चित्रपटाच्या क्रूबरोबर सध्या प्रमोशन करताना दिसत आहेत. 'लापता लेडीज चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. नुकत्याचं झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये संवादादरम्यान किरणनं 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या फ्लॉपवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 2022 रोजी प्रदर्शित झालेला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
'लाल सिंग चड्ढा' चित्रपटावर किरण दिली प्रतिक्रिया : चित्रपटाच्या अपयशावर भाष्य करताना किरण म्हटलं, 'हे खरोखर निराशाजनक आहे, कारण जेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता आणि ते काम बरोबर होत नाही, यानंतर वाईट वाटते. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबाबतही असेच घडले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनाचा परिणाम केवळ आमिरवरच नाही तर संपूर्ण टीमवर झाला. पुढं तिनं सांगितलं, 'हा चित्रपट आमिरचा 'ड्रीम प्रोजेक्ट' होता. या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी आमिरनं खूप मेहनत घेतली होती, मात्र या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकला नाही. यानंतर मी आमिरला हे सत्य स्वीकारण्यास सांगितले.''