महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कतरिना कैफ आणि विकी कौशल लंडनमध्ये घेत आहे सुट्टीचा आनंद, व्हिडिओ व्हायरल - katrina kaif and vicky kaushal - KATRINA KAIF AND VICKY KAUSHAL

Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही हातात हात घालून बेकर स्ट्रीटवरून फिरताना दिसत आहेत.

Katrina Kaif and Vicky Kaushal
कतरिना कैफ आणि विकी कौशल (कैटरीना कैफ और विक्की कौशल फाइल फोटो (@katrinakaif Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 2:00 PM IST

मुंबई - Katrina Kaif and Vicky Kaushal : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनच्या पॉवरपॅक कपल्सपैकी एक आहेत. नुकताच या जोडप्याचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघेही लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. कतरिना आणि विकी लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. व्हायरल होत डिओत हे जोडपे हिवाळ्यातील कपडे घालून बेकर स्ट्रीटवरून हात धरून चालत आहे. यादरम्यान विकी हा कतरिनाची काळजी घेत असताना स्पॉट झाला. आता अनेकजण कतरिनाचा हा व्हिडिओ पाहून ती प्रेग्नेंट असल्याचं म्हणत आहे.

कतरिना आणि विकीचा व्हिडिओ व्हायरल :या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "कतरिना ही नक्कीच प्रेग्नेंट आहे." दुसऱ्या एका चाहत्यांनं लिहिलं, " मीडिया कधीच बॉलिवूडमधील कलाकारांना प्राइवेसी देत नाही." आणखी एकानं लिहिलं, "हातात हात घालून फिरत त्यांनी लग्न केलं आहे." याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. कतरिना आणि विकी दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अनेकदा हे जोडपे आपले सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आता अलिकडेच विकीनं त्याचा 36वा वाढदिवस साजरा केला होता. या विशेष प्रसंगी कतरिनानं काही सुंदर फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशलचा वर्क फ्रंट : या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी कतरिना सलमान खानबरोबर 'टायगर 3'मध्ये दिसली होती. आता पुढं आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्राबरोबर फरहान अख्तरचा आगामी 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही. मात्र हा चित्रपट आता खूप चर्चेत आहे. याशिवाय तिचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट कार्तिक आर्यनबरोबर येत आहे. दुसरीकडे विकी हा 'छावा'मध्ये रश्मिका मंदान्नाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो 'बॅड न्यूज'मध्ये तृप्ती डिमरीबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क; नदीम खान आणि सलमान खानची मतदान केंद्रावर झाली भेट - Lok Sabha Elections 2024
  2. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन - Ashok Saraf
  3. जूनियर एनटीआर आणि प्रशांत नील 'ड्रॅगन' चित्रपटात करणार एकत्र काम - Jr NTR Next Film is Dragon

ABOUT THE AUTHOR

...view details