मुंबई - अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सुट्टीवर जात आहेत. आता दोघे मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले. विमातळावर या जोडप्यानं त्यांच्या स्टायलिश कॅज्युअल आउटफिट्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आता त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही कारमधून उतरल्यानंतर विमानतळाच्या दिशेन जात आहे. 29 डिसेंबरला विमानतळावर विकी कौशल आणि कतरिना कैफ आपल्या स्टायलिश अंदाजात एकत्र दिसले. यावेळी कतरिनानं राखाडी रंगाचा स्वेटशर्ट , स्वेटपँट आणि पांढरी टी-शर्ट परिधान केली होती. यावर तिनं आपले केस खुले सोडले होते. काळ्या सनग्लाससह कॅट खूप सुंदर दिसत होती.
विकी आणि कतरिना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज : दुसरीकडे विकीनं विमातळावरील लूकसाठी पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला होता. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. अलीकडेच, या जोडप्यानं लंडनमध्ये जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबियाबरोबर ख्रिसमस साजरा केला होता. या जोडप्यानं आपल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या जोडप्यानं शेअर केले फोटो हे, त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले होते. दरम्यान विकी आणि कतरिना सुट्टीसाठी कुठे जात आहेत, हे अद्यापही कळलेले नाहीत. आता विकी आणि कॅटच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या जोडप्याला कुठे जात असल्याचा प्रश्न विचारत आहेत. याशिवाय काही चाहते त्याच्या या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.