मुंबई - Kartik Aaryan :अभिनेता कार्तिक आर्यननं आज, 15 मे रोजी 'चंदू चॅम्पियन'मधील पोस्टर रिलीज केलं आहे. 14 मे रोजी कार्तिकनं त्याच्या चाहत्यांना सांगितलं होतं की, "प्रमोशन आजपासून सुरू होणार होते पण 'कटोरी'नं पोस्टर फाडले. आता पोस्टर उद्याच येईल. "कार्तिकच्या श्वानचं नाव 'कटोरी' आहे. त्याचा कटोरीबरोबरचा हा व्हिडिओ खूप मनोरंजक आहे. या व्हिडिओमध्ये कटोरीनं कार्तिकचं पोस्टर फाडलं. हे पोस्टर फाटल्यानंतर कार्तिक आर्यन म्हणाला होता की, आता पोस्टर उद्या येईल. पोस्टरमध्ये कार्तिक लाल लंगोडीमध्ये घामाने भिजलेला धावत दिसत आहे. याशिवाय त्याचे सिक्स पॅक ॲब्स आणि स्लिम चेहराही दिसत आहे.
'चंदू चॅम्पियन'मधील पोस्टर रिलीज : या चित्रपटामधील हे पोस्टर शेअर करताना त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "चॅम्पियन येत आहे, माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना मी खूप उत्सुक आहे." कार्तिकनं या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे, हे या पोस्टरवरून कळते. 'चंदू चॅम्पियन'मधील हे पोस्टर खूप धमाकेदार आहे. 'चंदू चॅम्पियन' हा कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित स्पोर्ट्स बायोग्राफीकल चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. कार्तिक या चित्रपटात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरलीकांत हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे.