मुंबई - Crew Offer : चित्रपटगृहात 29 मार्चला प्रदर्शित झालेला 'क्रू' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडल्याचं दिसतय. या चित्रपटामध्ये करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या तिन्ही अभिनेत्रींनी या चित्रपटामध्ये धमाकेदार अभिनय केलाय. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. 'क्रू' चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त 150 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 'क्रू'च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की कोणत्याही सिनेमा हॉलमध्ये 'क्रू' चित्रपटाची तिकिट किंमत 150 रुपये असेल.
'क्रू'च्या निर्मात्यांनी केली घोषणा : 'क्रू' चित्रपटात करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू व्यतिरिक्त पंजाबी अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ आणि कॉमेडियन कपिल शर्मा आहेत. 'क्रू'च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक उत्तम ऑफर आणलीय. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं, "तुमच्या 'क्रू'ला एका अविश्वसनीय ऑफरसाठी एकत्र करा ही ऑफर तुम्हाला चुकवायची नाही. फक्त 150 रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये या मजेदार फ्लाइटचा अनुभव घ्या." आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल घोषणा करताच चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. या पोस्टवर अनेकजण आता आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये पाहण्यासाठी जाणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.