मुंबई - Kareena Kapoor khan Toxic : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर चित्रपट 'केजीएफ' स्टार यश त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाबरोबर करीना कपूर खानचं नाव जोडलं गेलं होत. 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये करीना कपूर खान यशच्या बहिणीची भूमिका साकारणार होती. आता करीनानं या चित्रपटातून माघार घेतली आहे. 'टॉक्सिक'मधून बाहेर पडण्याचं, कारण म्हणजे तिची भूमिका या चित्रपटात खूप कमी लांबीची आहे. 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये कियारा अडवाणी आणि श्रुती हासन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करीनाचे पात्र कमी असल्यानं तिला चित्रपटात छाप सोडणे कठीण होऊ शकते, त्यामुळे आता ती 'टॉक्सिक'मध्ये दिसणार नाही.
करीना कपूरनं सोडला 'टॉक्सिक' चित्रपट :आता करीनाच्या चाहत्यांसाठी ही दुःखाची बातमी आहे. करीना टॉक्सिक चित्रपटातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करणार होती. आता 'टॉक्सिक' चित्रपटात अभिनेत्री नयनतारा या भूमिकेसाठी दिसणार आहे, मात्र निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही. त्याचबरोबर यशच्या बहिणीच्या भूमिकेसाठी माजी वर्ल्ड मिस ऐश्वर्या रायचे नावही समोर येत आहे. सध्या या चित्रपटाबद्दल अनेक बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. दरम्यान करीना कपूर खान चित्रपटातून बाहेर पडताच निर्मात्यांनी या भूमिकेसाठी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 'टॉक्सिक' या चित्रपटाची वाट आता अनेकजण पाहात आहेत.