मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शननं करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधील 50 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शन्स आणि धर्मा प्रॉडक्शननं जागतिक प्रेक्षकांसाठी चांगला आशय पोहोचवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. धर्मा प्रोडक्शननं 21 ऑक्टोबर रोजी अधिकृत निवेदनाद्वारे याबद्दल पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू होती की, करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन हाऊस तोट्यात आहे. करण मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला आपला काही हिस्सा विकण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. आता अदार पूनावालानं करणच्या कंपनीचे पन्नास टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.
धर्मा प्रॉडक्शनमधील 50 टक्के हिस्सा अदार पूनावालानं घेतला विकत :सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी, करण जोहरचा धर्मा आणि अदार पूनावालाच्या सेरेन एंटरटेनमेंटनं एक संयुक्त निवेदन जारी केले, यामध्ये असं लिहिलं आहे की, 'अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शननं आज जाहीर केलं की, त्यांनी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या भारतातील आघाडीच्या बॅनरशी संयुक्त उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे. सेरेन प्रोडक्शन हाऊसनं धर्माटिक एंटरटेनमेंट ('धर्मा') मध्ये 1,000 कोटीचा गुंतवण्याचा बंधनकारक करार केला. 'या गुंतवणुकीद्वारे सेरेन प्रॉडक्शन धर्मामध्ये 50 टक्के हिस्सेदारी ठेवणार आहे. याशिवाय उर्वरित 50 टक्के मालकी करण जोहरकडे राहिल.
अदार पूनावालाचं विधान : कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं, करण जोहर कंपनीचे नेतृत्व करेल, तर अपूर्व मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या भूमिकेत असेल, धोरणात्मक दिशानिर्देश आणि संस्थेच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी करणबरोबर अपूर्व देखील काम करेल. दरम्यान या कंपनीचा हिस्सा विकत घेतल्याबद्दल बोलताना अदार पूनावाला यांनी म्हटलं, "मित्र करण जोहरबरोबर प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊसमध्ये भागीदारी करण्याची संधी मिळाल्यानं मी आनंदी आहे. आम्हाला आशा आहे की, येत्या काही वर्षांत धर्माची आणखी प्रगती होईल आणि आम्ही यापेक्षा अधिक उंची गाठू."