मुंबई : भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कपिल शर्मासह चार कलाकारांना धमकीचे ईमेल आले आहेत. या ईमेलमध्ये कपिल शर्मा, त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही कलाकारांपैकी एक आहे. तो एका एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये घेत असतो. आता आम्ही तुम्हाला त्याच्या कमाईबद्दल सांगणार आहोत.
कपिल शर्मा एका एपिसोडसाठी किती पैसे घेतो? : कॉमेडियन कपिल शर्मा हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी कॉमेडियन असून तो जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांची कॉमेडी अनेकांना पसंत पडते. कपिलला 'द कपिल शर्मा शो'मधून खूप प्रसिद्धी मिळली. आज त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटी रुपये मानधन घेत असतो. टीव्हीवर धुमाकूळ घातल्यानंतर, कपिल शर्मा आता ओटीटीवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'द्वारे जगात जादू दाखवत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या सीझनची खूप प्रशंसा करण्यात आली होती. या शोच्या दुसऱ्या सीझननेही खूप चर्चा सोशल मीडियावर निर्माण केली होती. हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असतो. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'नंतर कपिल शर्माच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.
कपिल शर्माची एकूण संपत्ती : आयएमडीबीच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या 2 सीझननंतर, कपिल शर्माची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये झाली आहे. यानंतर, कपिल शर्मा हा हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. याशिवाय, भारतातील सर्वात श्रीमंत विनोदी कलाकारांच्या यादीत कपिल शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार ब्रह्मानंदम आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 490 कोटी रुपये आहे.
कपिल शर्माची कारकीर्द : कपिल शर्मानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात 500 रुपये पगारानं केली होती. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 3' मधील विजयानं त्यानं सर्वप्रथम सर्वांचे मन जिंकले. यानंतर त्यानं 'कॉमेडी सर्कस' सारख्या हिट कॉमेडी शोद्वारे लोकांना खूप हसवलं. तसेच तो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो घेऊन आला. या शोद्वारे तो भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक बनला. कपिल शर्मानं त्याच्या टेलिव्हिजन कारकिर्दीव्यतिरिक्त चित्रपटांमध्येही नशीब आजमावलं आहे. त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'किस किस को प्यार करूं' आहे. यानंतर त्यानं 'फिरंगी', 'झ्विगातो' आणि 'क्रू'सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :
- कपिल शर्मासह 'या' स्टार्सला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आलेला ईमेल चर्चेत
- ॲटलीवर वर्णद्वेषी विनोद केल्याचा आरोप झाल्यानंतर कपिल शर्मानं दिलं यूजर्सला उत्तर...
- कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2'मध्ये पुन्हा होईल धमाका, वरुण धवन 'बेबी जॉन'च्या टीमबरोबर लावणार हजेरी