महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपची आई सरोजा संजीवचं निधन, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - SUDEEP MOTHER SAROJA SANJEEV DEATH

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन झालंय. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Kichcha Sudeep
किच्चा सुदीप (किच्चा सुदीप (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 20, 2024, 3:01 PM IST

मुंबई : 'मक्की' फेम अभिनेता किच्चा सुदीपच्या घरी शोककळा पसरली आहे. सुदीपची आई सरोजा संजीव यांचे रविवारी 20 ऑक्टोबर रोजी निधन झालंय. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर किच्चा सुदीपच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'अभिनेता श्री किच्चा सुदीप यांची आई सरोजा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. दिवंगत आत्म्याला शांती लाभो आणि देव सुदीप आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो. ओम शांती'.

किच्चा सुदीपच्या आईचं निधन : रिपोर्ट्सनुसार, किच्चा सुदीपची आई सरोजा संजीव यांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे जयनगरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैद्यकीय पथकानं त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करूनही ते यात अपयशी ठरले आणि आज सकाळी त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. किच्चा सुदीप हा शेवटच्या क्षणी आईबरोबर होता. सरोजा संजीव या दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्येनं त्रस्त होत्या. अलीकडेचं त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. दरम्यान किच्चा सुदीपच्या चाहत्यांनी त्याच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुदीपच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून हिंमत देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स किच्चा सुदीपच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत.

किच्चा सुदीप चित्रपट : किच्चा सुदीप अनेकदा त्याच्या आईबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना दिसतो. त्यानं आपल्या आईचा अनेक वेळा मुलाखतीत उल्लेख केला असून प्रत्येक निर्णयात तिनं कशी साथ दिली, याबद्दल त्यानं बऱ्याचदा सांगितलं आहे. किच्चा सुदीप हा आपल्या यशाचे श्रेय त्याच्या आईला देतो. सुदीपच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या 'बिग बॉस कन्नड' होस्ट करत आहे. 'मक्की' या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर नानी आणि सामंथा रुथ प्रभु सारखे कलाकार होते.

ABOUT THE AUTHOR

...view details