मुंबई - Kangana Ranaut Slap Row : अभिनेत्री कंगना राणौतच्या कानशीलात मारल्याचं प्रकरण तापलं आहे. कंगनाला अनेकजण पाठिंबा देत आहे. या प्रकरणात कंगना राणौतला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड अध्यायन सुमन आणि त्याचे वडील शेखर सुमन, अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर खेर हे आहेत. दरम्यान अध्यायन सुमनला कंगनाविषयी विचारे असता तो प्रश्न हा टाळताना दिसला आणि त्यानंतर त्याच्या वडीलांनी म्हटलं, "कुणाला कानशीलात मारणं हे चुकीचं आहे, त्या आता खासदार आहेत, जे काही झालं ते निषेधार्ह आहे, कुणाला विरोध करायचा असेल तर वेगळा मार्ग असू शकतो, हे पब्लिकली योग्य नाही."
कंगना राणौतनला झापड मारल्या प्रकरणी अधय्यन सुमननं दिली प्रतिक्रिया :यानंतर अध्यायन सुमन म्हटलं, "माझ्या वडीलांचं बोलणं अगदी बरोबर त्या महिलेनं तिचा वैयक्तिक राग सार्वजनिकपणे व्यक्त केला हे चुकीचं आहे." अध्यायन आणि शेखर 'हीरामंडी: द डायमंड बाजार'मध्ये शेवटी दिसले होते. ही वेब सीरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. या वेब सीरीजमध्ये शर्मीन सेगल, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, फरीदा जलाल, जयती भाटिया, ताहा शाह, फरदीन खान आणि इतर कलाकार दिसले होते. 'हीरामंडी: डायमंड बाजार' ही संजय लीला भन्साळी यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेली वेब सीरीज आहे. प्रचंड हिट झाल्यांतर आता या वेब सीरीजचा दुसरा पार्ट येणार आहे.