महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंगना राणौतनं करण जोहरला दिली चित्रपटाची ऑफर, म्हणाली 'मी त्यांना एक चांगली भूमिका देईन...' - KANGANA RANAUT AND KARAN JOHAR

कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला एका चित्रपटाची ऑफर दिली आहे.

Kangana Ranaut and Karan Johar
कंगना राणौत आणि करण जोहर (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 10, 2025, 4:06 PM IST

मुंबई :अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या कंगना या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या विधानमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला तिनं एका चित्रपटाची ऑफर दिली आहे. अलीकडेच, कंगना 'इंडियन आयडल 15' या गायन रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकली, जिथे तिनं करण जोहरबरोबर काम करायला आवडेल असं सांगितलं. शोदरम्यान कंगनानं करण जोहरला चित्रपटाची ऑफर दिली, यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व लोक चकित झाले.

कंगनानं करण जोहरला दिली चित्रपटाची ऑफर : कंगनानं करण जोहरला चित्रपटाची ऑफर देताना म्हटलं, "माफ करा, पण करण सरांनी माझ्याबरोबर एक चित्रपट करावा. मी एक खूप चांगला चित्रपट बनवेन. त्यांना चित्रपटात चांगली भूमिका देखील देईन, जो सासू -सासरे आणि सुनेच्या भांडणावर आधारित नसेल. हा एक चांगला चित्रपट असेल. त्यांना मी योग्य भूमिका देईल." करण जोहर आणि कंगना राणौत यांच्यातील वाद खूप जुना आहे. दोघेही एकमेकांच्या नावांवर प्रतिक्रिया देऊन अनेकदा चर्चेत राहिले आहेत. कंगनानं अनेकदा करणबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कंगना-करण वाद :2017 मध्ये, कंगना 'कॉफी विथ करण सीझन 5'च्या एका एपिसोडमध्ये तिच्या 'रंगून' चित्रपटाचा सहकलाकार सैफ अली खान आणि शाहिद कपूरबरोबर आली होती. यानंतर या शोमध्ये रॅपिड फायर सेगमेंट झाला. यादरम्यान करणनं कंगनाला विचारलं की ती तिच्या बायोपिकमध्ये खलनायक कोणाला पाहते, यावर कंगनानं त्याच्याकडे बोट दाखवत म्हटलं, "ज्यानं नेपोटिज्म सुरू केले." यावर करणला खूप आश्चर्य वाटलं. त्यानंतरच कंगनानं त्याचं नाव 'मूव्ही माफिया' ठेवलं. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आता देखील हा वाद त्याच्यामध्ये सुरूच आहे.

'इमर्जन्सी' 'या' दिवशी होणार प्रदर्शित : कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपट 17 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेता सतीश कौशिक, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महिला चौधरी आणि विशाखा नायर हे कलाकार दिसणार आहेत. कंगना राणौतनं या चित्रपटात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगनानं स्वत: केलं आहे.

हेही वाचा :

  1. बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं प्रियांका गांधींना 'इमर्जन्सी' चित्रपट पाहण्यासाठी दिलं आमंत्रण...
  2. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
  3. विकास बहल आणि कंगना राणौत 'क्वीन 2'साठी पुन्हा येणार एकत्र, 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी झाली पुष्टी

ABOUT THE AUTHOR

...view details