मुंबई -Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना राणौतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलय. उलट भाजपानं एक निवेदन जारी केलं असून कंगना रणौतला धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलय. भाजपा खासदार कंगनानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेलं विधान हे पक्षाचं मत नाही, असं सांगत पक्षानं एक निवेदन जारी केलं. कंगना राणौतच्या वक्तव्यावर भाजपानं असहमती व्यक्त केली आहे. कंगनानं पक्षाच्या वतीनं भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर भविष्यात असं कोणतंही वक्तव्य करू नये, असे तिला निर्देश देण्यात आले आहेत. कंगना म्हणाली होती की, जे बांगलादेशात झालं ते येथेही व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी आंदोलनात मृतदेह लटकत होते, बलात्कार होत होते. वाचा संपूर्ण बातमी...
कंगना राणौतचं वादग्रस्त विधान :कंगनानं असं म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सरकारच्या सतर्कतेमुळे तसं झालं नाही. कंगना राणौतच्या वक्तव्यावरुन बराच वाद आता निर्माण झाला आहे. याआधीही शेतकरी आंदोलनादरम्यान तिनं काही कमेंट्स केल्या होत्या, यानंतर तिच्याविरोधात संताप भडकला होता. यापूर्वी चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफच्या जवानानं तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर कुलविंदरनं शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिची आईही सामील झाली होती असं सांगितलं होतं. कंगनानं आंदोलन करणाऱ्या महिलांबद्दल म्हटलं होतं की, या महिलांना प्रत्येकी 100 रुपये देऊन आणण्यात आल होतं, यानंतर अनेकजण तिच्यावर चिडले होते.