महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कंगना राणौतनं 'एमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर - चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Emergency Release Date Announced : अभिनेत्री कंगना रणौतनं 'एमर्जन्सी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. तिनं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

Emergency Release Date Announced
इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 2:46 PM IST

मुंबई - Emergency Release Date Announced : बॉलिवूड 'क्वीन' कंगना रणौतनं आज, 23 जानेवारी रोजी सकाळी तिच्या बहुप्रतीक्षित पॉलिटिकल ड्रामा चित्रपट 'एमर्जन्सी'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'एमर्जन्सी' या चित्रपटामुळे कंगना ही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत. या चित्रपटामध्ये ती देशाच्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. 'एमर्जन्सी' चित्रपटामध्ये देशात लागलेल्या आणीबाणीबद्दल दाखविण्यात येणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातून परतल्यानंतर कंगना रणौतनं चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज तारीख समोर : कंगना राणौतनं स्वतः या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी 14 जून 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'एमर्जन्सी' एक पीरियड पॉलिटिकल ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, कंगनानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, ''भारतातील सर्वात गडद काळामागील कहाणी अनलॉक करा. चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे, पीएम इंदिरा गांधींना चित्रपटगृहात पाहण्यासाठी तयार व्हा.'' या पोस्टवर अनेकजण कमेटस् करून कंगनाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

'एमर्जन्सी' चित्रपटाची स्टार कास्ट :या चित्रपटामध्ये कंगना रणौतव्यतिरिक्त अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाल नायर आणि सतीश कौशिक आदी कलाकार दिसणार आहेत. अभिनेता सतीश कौशिक आता या जगात नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. कंगनानं हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली आणि झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे. कंगनाचे मागील काही चित्रपट 'तेजस', 'धाकड', 'थलायवी', 'पंगा' हे बॉक्स ऑफिसवर खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे तिला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये कंगनाचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये विकी जैननं मीडियासमोर अंकिता लोखंडेची मागितली माफी
  2. चित्रीकरणादरम्यान सैफ अली खानला दुखापत, गुडघा आणि खांद्यावर झाली शस्त्रक्रिया
  3. श्रीराम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यातील आकाश अंबानी आणि श्लोकाचा फोटो झाला व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details